कुटुंबांमध्ये काही अशा घटना असतात जर त्या बाहेरच्या व्यक्तींना समजल्या तर त्याची एक वेगळीच चर्चा होत असते. मात्र असं काही असलं तरी काही लोकांना खरं बोलायला कोणाचीच भीती वाटत नाही. अशीच एक घटना एका महिलेने सोशल मीडियावरून (Social Media) उघड केली आहे. तिने आपल्या नात्यासंबंधाबद्दल (Relationship) खुलासा करताना सांगितले की, तिने आपल्याच सावत्रभावासोबत (step brother) लग्न केल्याचे उघड केले आहे. अलाबामा येथे राहणारे लिंडसे आणि केड ब्राउन यांचे 2013 मध्ये लग्न झाले होते, तर आता त्यांना दोन मुलंही आहेत. ज्या महिलेनं ही गोष्ट सांगितली आहे ती आणि तिचा नवरा ही दोघंही सावत्र बहीण भाऊ आहेत.
ADVERTISEMENT
नात्यात वेगळेच ट्विस्ट
लिंडसे सांगते की, आम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पडून काहीही चुकीचे केले नाही कारण आम्ही कायमस्वरूपी असे बहीण-भाऊ नव्हतोच. लिंडसेला TikTok वर @girl_meets_bro या नावाने ओळखतात. नात्यासंबंधाबद्दल सांगताना ती म्हणते की, आम्ही किशोरवयीन असताना आम्ही दोघं एकमेकांना भेटलो होतो. तिने शेअर केलेल्या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे की, ‘मी 14 वर्षांची असताना मला माझ्या खिडकीमध्ये एक अनोळखी मुलगा दिसला होता मात्र आम्ही तेव्हा कधीच एकमेकांना भेटलो नाही. आता 15 वर्षांनंतर भेटलो तेव्हा तो माझा नवरा आणि सावत्र भाऊही आहे. तिचे या घटनेत एक वेगळेच ट्विस्ट आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टवर काही लोकांनी खूप विनोदी हास्यास्पद कमेंट टाकल्या आहेत. तर काहींनी तिच्या या लग्नाला एक अपघात असल्याचेही म्हटले आहे.
डेटिंग केले सुरु
लिंडसेने आपल्या नातेसंबंधाबद्दल केलेल्या व्हिडीओंच्या मालिकेते तिने स्पष्ट म्हटले आहे की, ज्या प्रमाणे ही लोकं जेवढं समजतात तेवढं विचित्र आणि वेगळं असं त्यात काहीच नाही. कारण आम्ही दोघांनी बहीण भाऊ असल्याचे समजण्यापूर्वीच आम्ही डेटिंग सुरु केले होते. आम्ही डेटिंगला सुरुवात केले तरी आमचे पालकांनी मात्र लग्नाच्या फंदात पडले नाही, त्यांनी लग्नच केले नाही.
हे ही वाचा >>Aditya L1 मोहिमेत मोठं यश! SUIT ने पाठवलेले सूर्याचे 11 फोटो पाहिलेत का?
बेडरूममध्ये घुसणार होता
लिंडसेला ही सगळी गोष्ट सांगताना तिला 2007 मध्ये ती आणि केड हायस्कूलमध्ये पहिल्यांदा कसे भेटले होते ती गोष्ट आठवली. त्याचवेळी तो जेव्ही तिच्या बेडरूममध्ये घुसणार होता, तेव्हाच तिच्या आईने त्याला पकडले होते, आणि तेव्हा त्यांचे प्रेमप्रकरण थांबले होते. ती घटना घडल्यानंतर केडला माझ्यापासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र 2013 मध्ये आम्ही पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून भेटलो आणि एकत्र आलो.
आईचं काहीच ऐकलं नाही
लिंडसे सांगते की, आधीप्रमाणे मी माझ्या आईचं काहीच ऐकलं नाही, थेट मी केडला त्याच्या वडिलांकडे भेटायला गेले. मात्र त्यावेळी माझी आईही माझ्या मागावर होती हेही त्यावेळी मला समजलं. त्यावेळी मी पहिल्यांदाच केडच्या वडिलांना भेटलो होतो. त्यानंतर माझी आई आणि केडच्या वडिलांना भेटली होती.
पालकांनी नंतर केलं लग्न
लिंडसेने आपल्या नात्याबद्दल सांगताना ती आपल्या आईबद्दलही सांगते. ती म्हणते की, काही दिवसानंतर केड एका वर्षाच्या लष्करी प्रशिक्षणासाठी निघून गेला होता. त्यावेळी मीही तिथे थांबली नाही. मात्र त्याचवेळी आमच्या पालकांनी मात्र डेटिंग सुरू केले होते, पण त्याची आम्हाला कोणतीच माहिती नव्हती. लष्करी प्रशिक्षण घेऊन केड पुन्हा आला तेव्हा मात्र तो माझ्यासोबत राहू लागला आणि दोन आठवड्यांनंतर आम्ही कोणालाही न सांगता लग्न केले. आम्ही लग्नाचा लवकर विचार केला मात्र आमच्या पालकांनी लग्न करण्याचा विचार जवळपास वर्षभरानंतर केला. तेव्हापासून आम्ही सर्व एकत्रच राहतो. माझ्या सावत्र भावाशी मी लग्न केल्यामुळेच लोकंही आता वाईट आमच्याबद्दल वाईट बोलतात.
ADVERTISEMENT