ब्रेकअप होण्याची अनेक कारणे असतात. एकमेकांना चीट केल्यामुळे ब्रेकअप होतो. एकमेकांना वेळ न दिल्याने ब्रेकअप होतो, अशी अनेक कारणे आहेत. मा्त्र या घटनेत एका टॉयलेट पेपरने ब्रेकअप घडवून आणला आहे. हे कारण ऐकूण अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र ही खरी गोष्ट आहे. नेमकं या घटनेत ब्रेकअपला टॉयलेट पेपर कसा कारणीभूत ठऱला आहे, हे जाणून घेऊयात. (women break up with boy friend just because toilet paper viral story social media)
ADVERTISEMENT
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, फ्लोरीडाच्या टम्पाची रहिवासी असलेल्या अलेक्झाड्रा मारीया क्लारा तिच्या बॉयफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघांचे नाते खूप चांगले सुरू होते. या दरम्यान एके दिवशी मारीया तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी जाते. घरी पोहोचल्यावर ती बॉयफ्रेंडच्या घरचे वॉशरूम वापरते. मात्र हे वॉशरूम वापरताना टॉयलेट पेपरच संपल्याचे दिसून येते. त्यानंतर मारीया बाहेर येऊन तिच्या प्रियकराला टॉयलेट पेपर संपल्याचे सांगते. यावर तो तिला सॉरी म्हणतो. यावर मारिया म्हणाली, काही हरकत नाही, आणि मी माझ्या पर्समध्ये काही टिश्यू ठेवल्यामुळे माझे काम झाले आहे. त्यानंतर मारीया सुपर मार्केटमध्ये जाऊन बॉयफ्रेंडला टीश्यु पेपर आणण्याचा सल्ला दिला. यावर बॉयफ्रेंड तिचे आठवण करून दिल्याबद्दल आभार मानतो.
हे ही वाचा : Solapur: लग्नाच्या दिवशी नववधूची आत्महत्या, ठाकरेंची रणरागिणी फडणवीसांवर संतापली
या घटनेच्या एका आठवड्यानंतर मारीया पुन्हा तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी येते. यावेळेच बॉयफ्रेंडचा बाथरूम चेक करते तर, अद्यापही त्याने टॉयलेट पेपर आणलेले नसतात. यावर मारीया त्याला विचारणा केली असता, तो म्हणतो विसरलो होतो.यानंतर मारीया तिच्या बॉयफ्रेंडसह सुपरमार्केटमध्ये जाते. यावेळी देखील ती बॉयफ्रेंडला टॉयलेट पेपर खरेदी करण्याची आठवण करून देते. मात्र यावर बॉयफ्रेंड जे उत्तर देते त्याने मारीया हादरते. तो म्हणाला विकत घेऊ नको, मी ते अजिबात वापरत नाही. मी ओले वाइप्स वापरतो, असे त्याने उत्तर देताच मारीयाला धक्का बसतो.
मारिया यानंतर जेव्हाही बॉयफ्रेंडच्या घरी जाते, तेव्हा ती वॉशरूममध्ये जाण्यापूर्वी तिच्या कारच्या चाव्या हातात घेते आणि कारमधून टॉयलेट पेपर आणते.मारीयाच्या या कृतीवर बॉयफ्रेंड तीची खिल्ली उडवायला सुरुवात करतो. बॉयफ्रेंडची ही कृती पाहून मारीयाला कळून चुकते की, हे नात फार काळ टीकणार नाही आणि ती बॉयफ्रेंशी ब्रेकअप करते.
हे ही वाचा : Covid-19 JN.1 strain: धडकी भरवणारी बातमी… महाराष्ट्रासह 3 राज्यात सापडले Corona रुग्ण
मला समजले की आमचे नाते खूपच खालच्या पातळीवर पोहोचले आहे. मी हे नाते तोडण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही वेगळे झालो, असे शेवटी मारिया म्हणते. मारीयाने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून तिच्या या ब्रेकअपची स्टोरी सांगितली आहे. या तिच्या स्टोरीवर अनेकांनी तिला धीर दिला होता. तसेच टॉयलेट पेपरवरून ब्रेकअप झाल्यावरून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
ADVERTISEMENT