Women Kills Husband Crime News : मेरठच्या एका हत्याप्रकरणामुळं संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे. अनैतिक संबंधाच्या प्रकरणामुळे एका महिलेनं (मुस्कान) तिच्या पतीची निर्घृण हत्या केली. मुस्कानने प्रियकर साहिलच्या तिचा पती सौरभची निर्घृणपणे हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे सौरभची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह ड्रममध्ये भरून त्यावर सिमेंट लावण्यात आलं. सौरभच्या हत्या केल्यानंतर आरोपी मुस्कान आणि साहील दोघेही हिमाचलमध्ये पसार झाले. पोलिसांनी आरोपी मुस्कान आणि साहिलला अटक केली असून या हत्याकांडाचा पर्दाफाश कशा झाला, याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती..
ADVERTISEMENT
संपूर्ण प्रकरण काय आहे?
एका महिलेनं तिच्या पतीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना मेरठच्या ब्रम्हपूरी येथील इंदिरानगरमध्ये घडली. येथील रहिवासी सौरभ राजपूत लंडनमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होते. 2016 मध्ये त्यांनी कुटुंबाच्या निर्णयाविरोधात जाऊन मुस्कान रस्तोगीशी लग्न केलं. कामानिमित्त सौरभ विदेशातच राहत होता. सौरभ काही दिवसांपूर्वी पत्नी आणि लहान मुलीला भेटण्यासाठी लंडनहून मेरठला आला होता.
परंतु, 4 मार्चनंतर सौरभ गायब झाल्याचं समोर आलं. तर सौरभची पत्नी मुस्कान हिमाचलमध्ये गेले होती. पतीसोबत हिमाचलमध्ये जात असल्याचं मुस्कानने शेजाऱ्यांना सांगितलं होतं. परंतु, मुस्कान तिचा प्रियकर साहिल शुक्लासोबत हिमाचलमध्ये गेली होती. 4 मार्चच्या रात्रीच मुस्कानने झोपेच्या वेळी सौरभची चाकू भोसकून हत्या केली होती. मुस्कानने साहिलच्या मदतीने सौरभची हत्या केली.
हे ही वाचा >> Nagpur Violence Mastermind: निवडणूक लढवणारा 'हा' नेताच निघाला नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड, फोटोही आला समोर..
मृतदेह ड्रममध्ये टाकला
सौरभची हत्या केल्यानंतर मुस्कान आणि साहिलने त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. ते तुकडे एका ड्रममध्ये टाकले. ड्रमवर सिमेंट लावलं आणि दोघेही हिमाचलमध्ये पसार झाले. मुस्कानमुळे सौरभचं त्याच्या कुटुंबियांशी वादविवाद होत होते. त्यामुळे सौरभ त्याच्या पत्नीसोबत भाड्याच्या घरात राहायचा. जेव्हा तो लंडनहून मेरठला यायचा, तेव्हा याच भाड्याच्या घरात राहायचा.
असा झाला हत्येचा पर्दाफाश
मुस्कानने हिमाचलमधूनच तिच्या आईला फोन करून सांगितलं की, तिने आणि साहिलने मिळून सौरभची हत्या केली आणि त्याचा मृतदेह ड्रममध्ये भरला. ही माहिती ऐकताच मुस्कानच्या आईला धक्काच बसला आणि तिने पोलिसांकडे धाव घेत झालेल्या घटनेबाबत माहिती दिली.
हे ही वाचा >> Nagpur Violence : "हिंसाचारादरम्यान महिला पोलिसांचा विनयभंग", FIR मध्ये काय म्हटलंय?"
अशाप्रकारे काढला सौरभचा मृतदेह
ज्या ड्रममध्ये सौरभच्या मृतदेहाचे तुकडे होते, त्यावर सिमेंट लावण्यात आलं होतं. पोलिसांनी ड्रम तोडण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु, पोलिसांना ड्रम उघडता आला नाही. त्यानंतर पोलिसांनी ड्रमला पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पाठवलं. त्याठिकाणी ड्रमला उघडण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला आणि मुस्कान आणि तिचा प्रियकरला साहिलला अटक केली.
ADVERTISEMENT
