jitendra Awhad-sheetal Mhatre News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे हे ट्विटरवर एकमेकांना भिडले आहेत. शितल म्हात्रे यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडीओवरून दोघांमधील वादाची ठिणगी पडली. म्हात्रे यांनी केलेल्या ट्विटला जितेंद्र आव्हाडांनी उथ्तर दिले आणि दोघांमधील वाद शिलगत गेला. याच वादात शितल म्हात्रे आव्हाडांना ‘पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी’, म्हणत डिवचलं, तर त्याला आव्हाडांनी ‘घरचा उपाशी बाहेरचा तुपाशी’, असं म्हणत प्रत्युत्तर दिलं.
ADVERTISEMENT
ठाण्यात एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असा राजकीय वाद रंगलेला असताना आता जितेंद्र आव्हाड आणि शितल म्हात्रे यांच्यात ‘ट्विट’वाद रंगला आहे.
शितल म्हात्रे-जितेंद्र आव्हाडांमध्ये का सुरू झाला वाद?
शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करणारा एक व्हिडीओ ट्विट केला. हा व्हिडीओ ट्विट करताना शितल म्हात्रे म्हणाल्या, “ह्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा?”, असा सवाल त्यांनी केला होता.
वाचा – ‘राज ठाकरेंचा इशारा आणि शिंदे सरकारची कारवाई, ही तर मॅच फिक्सिंग’ थेट कागद दाखवत जितेंद्र आव्हाडांचा मजारीवरील कारवाईवर शंका
शितल म्हात्रेंना जितेंद्र आव्हाडांनी एक फोटो ट्विट करून उत्तर दिले. आव्हाड म्हणाले, “ह्याच्यावर बोला ताई … खास तुमच्या माहितीसाठी कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे”, असं आव्हाड म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांच्या या ट्विटला शितल म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिले. “मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्विट चांगलाच झोंबलेलं दिसतयं… पण मला एक समजत नाही, मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय”, असं म्हणत शितल म्हात्रेंनी आव्हाडांना डिवचलं.
वाचा – आधी विधानसभेत आता ट्विटर! जितेंद्र आव्हाड-राम सातपुते भिडले, काय झालं?
त्यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला काम करताना गवगवा करण्याची सवय नाही… लोकांसाठी कार्यक्रम करतो… माझ्या मतदारसंघात येऊन विचारा… उघड्यावर लाज घालवणारे कृत्य मी करत नाही… आठवतेना काय ते ढुं@#, काय तो दांडा… धूर कुठून निघाला”, असा पलटवार जितेंद्र आव्हाडांनी शितल म्हात्रेंवर केला.
जितेंद्र आव्हाडांनी शितल म्हात्रेंना डिवचलं
शितल म्हात्रे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद वाढत गेला. जितेंद्र आव्हाडांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर शितल म्हात्रेंनी टीका केली. ‘पवारांची भाकरी आणि उद्धवजींची चाकरी… लगे रहो भाईजान’, असं शितल म्हात्रे म्हणाल्या. शितल म्हात्रेंनी ट्विट केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा उत्तर देत डिवचलं. ‘त्याची आपल्याला चिंता नसावी… उगाच बोलायला लावू नका, $%^ #@$ $%@ #$%”, असं म्हणत शितल म्हात्रेंना आव्हाडांनी उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT