World’s Richest Beggar In Mumbai : आतापर्यंत तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत आणि अब्जाधीश लोकांबद्दल बरंच काही ऐकलं असेल. पण तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात श्रीमंत भिकारी कोण आहे. असा हा भिकारी ज्याच्याकडे करोडोंची अफाट संपत्ती आहे. त्याहूनही आश्चर्याची बाब म्हणजे हा भिकारी भारतातलाच असून मुंबईत राहतो. या श्रीमंत भिकारी व्यक्तीचं नाव भरत जैन असं आहे. भरत 1 किंवा 2 कोटी रुपये नाही तर, चक्क 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेचा मालक आहे. (World’s Richest Beggar In Mumbai had Crores of Rupees Property)
ADVERTISEMENT
भरत कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक!
मिळालेल्या माहितीनुसार, भरत जैन यांची जागतिक स्तरावर जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळख झाली आहे. जिथे सहसा भिकारी हा शब्द ऐकला की, फाटक्या मळलेल्या कपड्यांमध्ये विखुरलेल्या केसांसह, घरदार नसलेला व्यक्ती आठवतो. याउलट भरत जैन यांनी भिकारी होऊनही करोडोंची संपत्ती जमा केली आहे.
वाचा : Crime : मित्राच्या बायकोसोबत संबंध अन् झाला भयंकर अतं, तिसऱ्या मजल्यारून…
मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकतात
भरत अनेकदा मुंबईच्या रस्त्यावर भीक मागताना दिसतो. त्याच्या कुटुंबाविषयी बोलायचं झालं तर तो विवाहित आहे आणि त्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुलं, भाऊ, वडील असा परिवार आहे. आर्थिक अडचणीमुळे भरत जैन यांना शिक्षण घेता आले नाही. मात्र त्याने आपल्या दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांची दोन्ही मुलं कॉन्व्हेंट शाळेत शिकतात.
महिन्याला जवळपास 75 हजार रुपयांपर्यंतची होते कमाई
भरत जैन यांची एकूण संपत्ती 7.5 कोटी रुपये आहे. भीक मागून त्याचे मासिक उत्पन्न 60,000 ते 75,000 रुपये आहे. भरतचा मुंबईत 1.2 कोटींचा दोन बेडरूमचा फ्लॅट आहे. ठाण्यात त्याने दोन दुकाने बांधली असून, तेथून दरमहा ३० हजार रुपये भाडे मिळते.
वाचा : Crime : दगडाने ठेचून मारण्यापूर्वी साक्षीसोबत कुणी ठेवले शारीरिक संबंध?
10-12 तास भीक मागून दिवसाला किती कमावतो?
एवढा श्रीमंत असूनही भरत जैन मुंबईत भीक मागताना दिसतो. 12-14 तास काम करूनही बहुतेक लोक एका दिवसात हजार रुपये कमावत नाहीत, परंतु भरत जैन 10 ते 12 तासांत भीक मागून दररोज 2000-2500 रुपये कमावतात.
भरत मुंबईत महागड्या फ्लॅटमध्ये राहतो!
भरत जैन अनेकदा छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा आझाद मैदान यांसारख्या प्रमुख ठिकाणी भीक मागताना दिसतात. एवढी संपत्ती असूनही तो भीक मागण्याचे काम सोडत नाही. त्याचे कुटुंब परळमधील 1BHK डुप्लेक्समध्ये राहते. याशिवाय कुटुंबातील इतर सदस्य स्टेशनरीचे दुकान चालवतात, जे उत्पन्नाचे आणखी एक साधन आहे. भरतच्या कुटुंबीयांनी त्याला भीक मागण्यास मनाई केली पण तो कोणाचंही ऐकत नाही.
ADVERTISEMENT