Yemeni Army Seizes Israeli Flagged Ship : येमेन सेनेने लाल समुद्रात एक इस्रायली ध्वज असलेले जहाज हायजॅक केल्याचा व्हिडीओ फुटेज येमेनने जारी केला आहे. व्हिडीओमध्ये येमेनच्या हुथींनी त्यांच्या सैनिकांसह जहाजावर उतरण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. यावेळी उतरून त्यांनी जहाज हायजॅक केले. युक्रेन, बल्गेरिया, फिलीपिन्स आणि मेक्सिकोसह अनेक देशांतील क्रू मेंबर्स या जहाजावर उपस्थित होते. (Yemeni Army landed by helicopter on Israeli Flagged Ship in Red Sea hijacked video viral)
ADVERTISEMENT
इस्रायलने जहाजाच्या हायजॅकिंगसाठी कोणाला जबाबदार धरले?
रविवारी (19 नोव्हेंबर) येमेनच्या हुथी मिलिशिया समूहाने दक्षिण लाल समुद्रात आंतरराष्ट्रीय मालवाहू जहाज हायजॅक केले. हे जहाज तुर्कीहून भारताकडे जात होते. इस्रायलने जहाजाच्या हायजॅकिंगसाठी इराणला जबाबदार धरले आहे, तर संपूर्ण जगासाठी ही सर्वात गंभीर घटना असल्याचे म्हटले जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने सांगितले की, ब्रिटनच्या मालकीचे जपानी मालवाहू जहाज इराणच्या सहयोगी हुथी सैनिकांनी हायजॅक केले.
वाचा: ‘होय माझ्या पाठीशी मोठी शक्ती’, जरांगे-पाटलांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
हमासने हुथीचे आभार मानले
या हायजॅकिंगसाठी हमासने हुथी सैनिकांचे आभार मानले आहेत. विमानात एकही इस्रायली नागरिक नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवण्यासाठी हे मालवाहू जहाज हायजॅक करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
वाचा: Covid 19 : कोरोना लसीमुळे भारतात होतायेत तरुणांचे मृत्यू?, ICMR चा रिपोर्ट
शिपिंग मार्गांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने म्हटले आहे की, इराणने केलेले हे दहशतवादी कृत्य असून त्यामुळे जगभरातील शिपिंग मार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हुथीनेही जहाज हायजॅक केल्याची पुष्टी केली आहे. मिलिशिया समूहाने इस्रायली जहाज हायजॅक घेतल्याचा दावा केला असला तरी तेल अवीवने तो फेटाळून लावला. हुथींनी एका निवेदनात म्हटले आहे की, हे जहाज दक्षिणेकडील लाल समुद्रातून येमेनी बंदरात नेण्यात आले. हमासचे प्रतिनिधी ओसामा हमदान म्हणाले, येमेनी बंडखोर संघटना हुथीचे हे स्वागतार्ह पाऊल आहे.
ADVERTISEMENT