नाशिक: गोमांस तस्करीच्या संशयावरून तरुणाची हत्या, भररस्त्यात नेमकं काय घडलं?

मुंबई तक

• 03:53 PM • 26 Jun 2023

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर-घोटी मार्गावर गोमांस तस्करीच्या संशयावरुन एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाणून घ्या नेमकी घटना काय आहे.

A shocking incident has come to light that a young man was killed on suspicion of beef smuggling on Sinnar-Ghoti road in Nashik district.

A shocking incident has come to light that a young man was killed on suspicion of beef smuggling on Sinnar-Ghoti road in Nashik district.

follow google news

नाशिक: नाशिकच्या (Nashik) सिन्नर-घोटी (Sinnar-Ghoti) परिसरात 24 जून 2023 रोजी एका भयंकर घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. सिन्नरच्या घोटी परिसरात एका कारमध्ये गोमांस (Beef) घेऊन जात असल्याच्या संशयावरुन दोन जणांन जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत (mob lynching) एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या मारहाणीत गाडीतील दोनही तरुण हे गंभीर जखमी झाले होते. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर दुसऱ्याची प्रकृती नाजूक असल्याचं समजतं आहे. (young man killed suspicion beef smuggling sinnar ghoti road nashik mob lynching)

हे वाचलं का?

नेमकी घटना काय घडली?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नासिर शेख आणि अफान अब्दुल मजीद अन्सारी शनिवारी म्हणजेच (24 जून) रोजी मुंबईच्या दिशेने जात होते. ते सिन्नर-घोटी महामार्गावर आले असता अचानक जमावाने त्यांची गाडी रोखून तपासणी केली. त्यानंतर कारमध्ये मांस आढळून आले. हे गोमांस असल्याचा संशय व्यक्त करत कारमधील दोघांना सुमारे 15 जणांनी लोखंडी रॉड आणि काठ्यांनी भीषण हल्ला केला. ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

दरम्यान, या दोन्ही जखमींना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे अफान अब्दुल मजीद अन्सारी याचा मृत्यू झाला. तर नसीर शेख याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी नाशिक ग्रामीणच्या घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 10 जणांना अटकही करण्यात आली आहे. ज्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं.

हे ही वाचा >> संभाजी भिडेंचं ‘ते’ प्रचंड वादग्रस्त भाषण जसंच्या तसं…, शिंदे सरकार आता काय करणार?

खासगी वाहनातून गोमांस घेऊन जात असताना सिन्नर-घोटी महामार्गावरील गंभीरवाडी शिवारात 10 ते 15 अज्ञातांनी दोघांना बेदम मारहाण केली. ज्यामध्ये कुर्ल्यातील 32 वर्षीय अफान अन्सारी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नाशिक ग्रामीण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नासीर शेख व त्याचा एक साथीदार अफान शेख हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून मांस घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते.

हे ही वाचा >> Sambhaji Bhide: ‘काळा दिवस, बटीक.. काय लायकीचं स्वातंत्र्य..’, संभाजी भिडे पुन्हा बरळले

मात्र सिन्नर तहसीलच्या घोटीजवळ वाटेत काही लोकांनी त्यांना अडवून गाडीची झडती घेतली असता गाडीत मांस होते. याच मुद्द्यावरुन पीडित व आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले व दरम्यान 10 ते 15 अज्ञात आरोपींनी पीडितेवर लोखंडी रॉड व काठ्यांनी हल्ला केला.

    follow whatsapp