Crime : कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड! पती, गर्भवती पत्नीसह 8 वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, नेमकं कारण काय?

मुंबई तक

09 Sep 2024 (अपडेटेड: 09 Sep 2024, 10:50 AM)

Raigad, Karjat Triple Murder Case : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पती, गर्भवती पत्नीसह 8 वर्षाच्या चिमुकल्याची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

Karjat Neral Tripal Murder Case

Karjat Neral Tripal Murder Case

follow google news

बातम्या हायलाइट

point

तिहेरी हत्याकांडामुळं रायगड हादरलं!

point

पती, गर्भवती पत्नीसह चिमुकल्याची केली हत्या

point

मृतदेह नाल्यात सापडल्यानंतर धक्कादायक माहिती आली समोर

Raigad, Karjat Triple Murder Case : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात तिहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पती, गर्भवती पत्नीसह 8 वर्षाच्या चिमुकल्याची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या करण्यात आली. नेरळ - पोशिर भागातील चिकनपाडा या गावात वाहत्या नाल्यात तीघांचेही मृतदेह सापडले. जैतु पाटील (35), अनिशा मदन पाटील, विवेक मदन पाटील (8) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावं आहेत. याप्रकरणी मदन पाटील यांच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्ननाखाली स्थानिक पोलीस तपास करत आहेत. (The shocking incident of triple murder in Karjat taluka of Raigad district has created a stir. Husband, pregnant wife and 8 year old Chimukalyachi were brutally murdered with sharp weapons)

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात असलेल्या नेरळ येथे उघडकीस आला आहे. सात महिन्यांच्या गर्भवती महिलेसह तिचा पती आणि 8 वर्षीय मुलाचा खून करण्यात आला, त्यानंतर त्यांचे मृतदेह नाल्यात फेकण्यात आले. 

हे ही वाचा >> Manoj Jarange: मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकणार? छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीत काय चर्चा झाली?

नेरळ - पोशीर भागातील चिकनपाडा या गावात दशक्रिया विधी सुरू असताना एका वाहत्या नाल्यात 8 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला. त्यानंतर मदन पाटील आणि त्यांची पत्नी अनिशा पाटील यांचा मृतदेह सापडला. धक्कादायक बाब म्हणजे मृत अनिशा पाटील या सात महिन्यांच्या गर्भवती होत्या.

पोलिसांनी मदन पाटील याच्या भावाला ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत. हे हत्याकांड कशामुळे व कुणी केले, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. संपत्तीच्या वादातून हा हत्याकांड घडल्याचं बोललं जात आहे. धारदार शस्त्राने हत्या करून नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीनही मृतदेह नाल्यात फेकून दिले असल्याची बाब उघड झाली आहे. कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत.

    follow whatsapp