Dombivali Crime : साखरपुड्यानंतर बलात्कार… लग्न दुसऱ्या मुलीशीच, नवरदेवाची पोलिसांनीच काढली वरात!

मिथिलेश गुप्ता

18 May 2023 (अपडेटेड: 18 May 2023, 02:25 PM)

डोंबिवलीतील तरूणाने साखऱपूडा एका तरूणीशी केला लगीनगाठ दूसरीशीच बांधल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणीने या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी थेट लग्नाच्या मंडपातून पोलीस ठाण्यापर्यंत आरोपी नवरदेवाची वरात काढली होती.

a boy fraud with to girl lure of marriage in dombivali

a boy fraud with to girl lure of marriage in dombivali

follow google news

देशात लग्नसराई सूरू आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. जागोजागी वराती आणि ढोल-नगाडे वाजत असल्याचे चित्र आहे. अशात एका लग्नाची भयानक गोष्ट समोर आली आहे.डोंबिवलीतील (Dombivali) तरूणाने साखऱपूडा एका तरूणीशी केला लगीनगाठ दूसरीशीच बांधल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरूणीने या घटनेची तक्रार पोलीस (police) ठाण्यात दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी थेट लग्नाच्या मंडपातून पोलीस ठाण्यापर्यंत आरोपी नवरदेवाची वरात काढली होती. सिद्धार्थ शिंदे (31) असे या नवरदेव आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. (a boy fraud with to girl lure of marriage in dombivali shocking story)

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

आरोपी सिद्धार्थ शिंदे याची सहा वर्षापूर्वी पीडित तरूणीशी भेट झाली होती. या भेटीनंतर तरूणीच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन लग्न (Married) करत असल्याचे भासवत तिच्याशी साखरपूडा केला होता. साखरपूड्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतक्यावर आरोपी थांबला नाही तर त्याने अनेकदा पैशाची अडचण सांगून लाखभर रूपये उकळले होते. अशाप्रकारे लग्नाचे आमिष दाखवून सिद्धार्थ शिंदेने तरूणीची फसवणूक करत लैंगिक छळ केला होता.

हे ही वाचा : लग्न केलं पण शारीरिक संबंधच ठेवले नाही, वैतागलेल्या बायकोने…

दुसरीसोबत चढला बोहल्यावर

आरोपी सिद्धार्थ शिंदे पहिल्या तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिची फसवणूक करत असताना, दुसरीकडे तो आणखीण एका तरूणीसोबत बोहल्यावर चढाईचीही तयारी करत होता.आरोपीची आई शांती आणि वडिल दिलीप या दोघांनी मिळून गावाकडील मुलीसोबत सिद्धार्थ याचा साखरपुडा केला होता. त्यानंतर या दोघांचे लग्न मुंबईत लावण्यात येणार होते. या घटनेची माहिती पीडित तरूणीला मिळताच तिने आपल्या कुटुंबासह डोंबिवली विष्णूनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन नवरदेव मुलगा सिद्धार्थ विरोधात अत्याचार आणि त्याच्या आई – वडिलांवर फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

दरम्यान पीडित तरूणीच्या तक्रारीनंतर पोलीसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस ठाण्याचे पोलिसांनी तपास सुरू केला. जसा नवरदेव सिद्धार्थ हा आपला दुसर लग्न करून जेव्हा घरी परतला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी पोलीस हजर होते. पोलिसांनी त्याची वरात थेट पोलीस ठाण्यात काढत नवरदेवाची रवानगी पोलीस कोठडीत केली. या घटनेत सिद्धार्थ शिंदे आई आणि वडिल फरार आहेत. या दोघांचा पोलीस शोध घेत आहे.

    follow whatsapp