भयंकर बदला अन् शारजाहचे तुरुंग : क्रिशन परेराची अटक ते सुटका, एका महिन्यात काय घडलं?

मुंबई तक

• 11:15 AM • 29 Apr 2023

अभिनेत्री क्रिसन परेराची तब्बल एका महिन्यानंतर शारजाहच्या तुरुंगातून सुटका झाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात 29 मार्चला शारजाह विमानतळावर तिला अटक करण्यात आली होती.

Mumbaitak
follow google news

मुंबई : अभिनेत्री क्रिसन परेराची (Krishan Perera) तब्बल एका महिन्यानंतर शारजाहच्या तुरुंगातून सुटका झाली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात 29 मार्चला शारजाह विमानतळावर तिला अटक करण्यात आली होती. मात्र, तपासांती क्रिशनला यात फसवले असल्याचे समोर आले आहे. क्रिशनचा ड्रग्जची तस्करी करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तिला याबद्दल काहीही माहिती नव्हते. त्यामुळे अखेर तिची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. (Actress Krishan Perera has been released from Sharjah jail after a month.)

हे वाचलं का?

निर्दोष सुटल्यानंतर क्रिशन प्रचंड आनंदी आणि भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. क्रिशनने तुरुंगातून बाहेर येताच पहिल्यांदा आईला व्हिडीओ कॉल केला होता. यात ती आनंदी दिसत होती. पण रडतानाही दिसून आली. क्रिशनची आई प्रेमिला परेरा याही आनंदाने भारावून गेल्या होत्या. क्रिशनचा आणि तिच्या आईचा व्हिडीओ कॉलचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतं आहे. क्रिशनचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी बराच संघर्ष करावा लागला होता. यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांचीही मदत घेतली. अखेर या संघर्षाला यश येऊन तिची सुटका झाली आहे.

भयंकर बदल्याची ठरली शिकार :

क्रिशन पेरारला ड्रग्ज प्रकरणात अडकविल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने काही दिवसांपूर्वी 2 संशयितांना अटक केली आहे. रवी बोभाटे (35) आणि अँथनी पॉल (35) असे दोघांचे नाव आहे. हॉलिवूडमध्ये काम देण्याचा शब्द देऊन या दोघांनी क्रिशन परेराला शारजाहाला पाठवलं आणि जाताना एक ट्रॉफी दिली, याच ट्रॉफीमध्ये ड्रग्ज लपविले होते, असे मुंबई पोलिसांच्या तपासात समोर आले होते. शारजामध्येही क्रिशनच्या हातातील एका ट्रॉफीमध्येच ड्रग्ज आढळून आले होते.

काय घडलं होतं क्रिशनसोबत?

याबाबत गुन्हे शाखेने दिलेली अधिक माहिती अशी की, अँथनी पॉल आणि रवी बोभाटे या दोघांनी मिळून क्रिशन परेराच्या आईचा बदला घेण्यासाठी या दोघांनी हा कट रचला. अँथनी पॉल काही वर्षांपूर्वी लॉकडाऊन दरम्यान क्रिशनच्या इमारतीत राहण्यासाठी गेला होता, त्यावेळी क्रिशन परेराच्या कुटुंबीयांच्या घरात असलेल्या कुत्र्याने अँथनीच्या पॉलचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका तुटलेल्या खुर्चीच्या मदतीने अँथनीने कुत्र्याला मारत दूर हटकण्याचा प्रयत्न केला. यावर क्रिशनची आई प्रमिला परेरा यांनी अँथनीचा पाणउतारा केला. यामुळे अँथनी दुखावला गेला. यानंतर त्याने रवी बोभाटेच्या सोबत मिळून हा कट रचला.

हे ही वाचा : कुत्र्यामुळे झालेला पाणउतारा… मुंबईची अभिनेत्री थेट शारजाहच्या तुरुंगात : वाचा भयंकर बदल्याची गोष्ट

क्रिशन परेराच्या कुटुंबाने गुन्हे शाखेला दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2023 मध्ये प्रेमिला परेरा यांना रवी नामक व्यक्तीकडून रिअल इस्टेट कर्जासाठी फोन आला. त्याने स्वतःची बिझनेसमन म्हणून ओळख करुन दिली. त्याच काळात तो कृष्ण परेराला भेटला होता, त्याने सांगितले की त्याने टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. रवी नावाच्या या व्यक्तीने क्रिशनला त्याच्या टॅलेंट पूल टीमशी ओळख करून देण्याची ऑफर दिली. मार्चमध्ये ग्रँड हयात हॉटेलमध्ये एका आंतरराष्ट्रीय वेब सीरिजसाठी त्याच्या टीमशी क्रिशनची ओळख करून दिली. यात क्रिशनची निवडही झाल्याचं सांगण्यात आलं.

त्यानंतर रवी नावाच्या व्यक्तीने क्रिशनला दुबईला जाऊन ऑडिशन देण्यास सांगितले. परेरा कुटुंबियांचे अनेक नातेवाईक दुबईत राहतात, त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला दुबईला जाण्याची परवानगी दिली. पण रवीने 27 मार्चला शारजाहसाठी तिकीट बुक केले. दुबईऐवजी शारजाहचे तिकीट का काढले, असे विचारले असता दुबईची फ्लाईट महाग आहे, त्यामुळे शारजाहचे तिकीट काढल्याचे त्याने सांगितले. तसंच जेव्हा शारजाहमध्ये ती उतरेल तेव्हा तिला दुबईला घेऊन जाण्यासाठी त्याच्या टीममधील लोक येतील. यामुळे कमी पैशांत दुबईला जाणं होईल.

हे ही वाचा : अनेक वर्षांच्या प्रेमाचा भयानक अंत; प्रेयसीला दिलं पेटवून अन् स्वतःलाही संपवलं…

क्रिशनच्या पासपोर्टची मुदत १० एप्रिल रोजी संपत होती. त्यामुळे ती 2 दिवसांमध्ये जाऊन, ऑडिशन देऊन माघारी येईल असे ठरवले. त्यानुसार ती शारजाहला जायला निघाली. त्याचवेळी 1 एप्रिलला निघण्यापूर्वी रवी क्रिशन परेराला विमानतळावर भेटला. तेव्हा त्याने क्रिशनला एक ट्रॉफी दिली आणि तिला सांगितले शारजाहामध्ये ऑडिशनसाठी घेऊन जाण्यास सांगितले. यामुळे वेब सीरिजच्या टीमसमोर चांगली छाप पडले, असे सांगितले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, शारजाहला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसेपर्यंत क्रिशन त्यांच्या संपर्कात होती. इतकचं नाही तर जेव्हा ती शारजाहामध्ये विमानतळावर पोहोचली तेव्हा तिने कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला लँडिंगबद्दलही माहिती दिली.

विमानतळावर उतरल्यानंतर रवीने पाठवलेले मेसेज पाहण्यासाठी क्रिशनने व्हॉट्सअॅप उघडले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. रवीने व्हॉट्सअॅपवरील डिसअॅपीअर मेसेज या फिचरचा उपयोग केल्याने पाठविलेले मेसेज गायब झाले होते. त्यानंतर क्रिशनने ज्या हॉटेलला तिच्या बुकिंगबद्दल सांगितले होते त्या हॉटेलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र हॉटेलमध्ये तिच्या नावावर बुकिंग नसल्याचे हॉटेलकडून क्रिशनला सांगण्यात आले. यानंतर आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे क्रिशनच्या लक्षात आले. तिने हा सगळा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला तेव्हा त्यांनी क्रिशनला तातडीने विमानतळ पोलिसांना घटनेची माहिती देण्यास सांगितले.

क्रिशनच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती पोलिसांना भेटण्यासाठी तेथे गेली तेव्हा तिच्या फोनची बॅटरी 3% होती. त्यानंतर क्रिशन आणि त्यांचा संपर्क तुटला.यानंतर कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि क्रिशनशी संपर्क न झाल्याबद्दल जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांना सांगितले की तिचे 3 एप्रिल रोजी परतीचे तिकीट आहे. यानंतर, भारतीय दूतावासाच्या ईमेलमधून क्रिशनला अटक केल्याची माहिती कुटुंबाला समजली.

हे ही वाचा : Sangli Crime: ज्ञानेश्वरी वाचत बसलेले डॉक्टर… सख्ख्या भावाने गळाच चिरला!

10 एप्रिल रोजी भारतीय वाणिज्य दूतावासाने कुटुंबाला सांगितले की तिच्याकडून ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याच आरोपाखाली तिला अटक करण्यात आली. तिच्याकडे असलेल्या ट्रॉफीमध्ये पोलिसांना ड्रग्ज आढळून आले होते. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने सध्या रवी आणि अँथनी पॉल नावाच्या या दोघांना अटक केली आहे.

शौचालयातील पाण्याने बनवली कॉफी अन्…’

दरम्यान, तुरुंगात असताना क्रिशनने लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने तुरुंगात घालवलेल्या तीन आठवड्यांबद्दल सांगितले आहे. हे सांगताना ती खूप भावूक झाली. तिने लिहिले की, ‘ मला तुरुंगात पेन आणि कागद मिळायला तीन आठवडे लागले. ‘मी टाइड सर्फने माझे केस धुतले, टॉयलेटच्या पाण्याने बनवलेली कॉफी प्यायली, बॉलीवूड चित्रपट पाहिले आणि खूप रडले. आपल्या भारतीय संस्कृतीवर अनेकदा हसले, टीव्हीवर काही ओळखीचे चेहरे पाहिले, भारतीय असल्याचा अभिमान वाटला. ज्यांनी माझा व्हिडीओ पाहिला आणि माझ्यासोबत हे घृणास्पद कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात मला मदत केली त्यांचे मी आभार मानते. मला आणि माझ्यासोबत ज्यांना फसवण्यात आले त्या सर्वांना यातून वाचवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते.

    follow whatsapp