कर्नाटकच्या चिक्काबल्लापुरमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका मित्रानेच मित्राची गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हत्या करून मित्र थांबला नाही तर त्याने मित्राचेच रक्त देखील प्यायले होते. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ त्याने मोबाईलच्या कॅमेरात कैद केला होता. यासोबतच हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल देखील केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे. तसेच या घटनेचा तपास पोलीस करीत असून मित्राच्या हत्येच्या प्रयत्नामागच कारण शोधल जात आहे. (affiar with wife man killed her friend chickballapura in karnataka crime story)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बटलाहल्ली गावातील चिंतामणी परीसरात आरोपी विजय हा राहतो आहे. विजयच्या मित्राचे नाव मारेश असे होते. या मारेशसचे विजयच्या बायकोशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाची कुणकुण विजयला लागली होती. त्यामुळे विजयने मारेशच्या हत्येचा प्लान आखला होता. या प्लाननुसार 19 जून रोजी विजय त्याच्या मित्र जॉनसोबत मारेशला जंगलातील निर्जनस्थळी घेऊन गेला होता.
हे ही वाचा : Crime: भयंकर… चाकू हातात घेत मित्राचा पाठलाग, हत्येचं कारण काय?
जंगलात घेऊन जाताच विजयने मित्र मारेशवर चाकु हल्ला करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या हत्येनंतर आरोपी विजयने त्याचे रक्त देखील प्यायले होते. विशेष म्हणजे विजयने जॉनच्या हातात मोबाईल देऊन हा संपुर्ण घटनाक्रम आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता. यानंतर विजयने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता.
मीडिया रिपोर्टनुसार, विजयच्या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या मारेशला एका व्यक्तीने रूग्णालयात अॅडमीट केले होते. ज्यामध्ये त्याच्यावर उपचार करून डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवले होते. यानंतर रूग्णालयातून सुट्टी घेऊन तो घरी परतला होता. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली आणि त्यांनी विजयला अटक केली होती. आता या घटनेने शहर हादरले आहे.
हे ही वाचा : आजी नातवाच्या मृतदेहाला सलग 10 दिवस घालत होती आंघोळ, बदलायची कपडे!
डोंबिवलीतही मित्राची हत्या
डोंबिवली पूर्वेकडे कल्याण-शिळ टाटा पावर परिसरात शैलेश शीलवंत हा तरुण राहत होता. शैलेश रिक्षा चालक असून त्याचे नाका कामगार असलेल्या किरण शिंदे यांच्याशी ओळख होती. शनिवारी रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून किरण हा शैलेशवर संतापला होता. याच वादातून किरणने शैलेशला टाटा पावर परिसरात एका इमारती शेजारी गाठले आणि शैलेशवर चाकूने हल्ला केला होता. हल्यानंतर जीव वाचवण्यासाठी शैलेशने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने शैलेश जमिनीवर कोसळला व त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अवघ्या तासाभरात किरण शिंदे याची ओळख पटवत त्याला बेड्या ठोकल्या.
ADVERTISEMENT