Ambernath : भाजप आमदार गोळीबार प्रकरणाचा वाद उफाळला, बिल्डर हत्यारबंद गावगुंडांसह आला अन्...तुफान राडा!

मिथिलेश गुप्ता

04 Sep 2024 (अपडेटेड: 04 Sep 2024, 04:56 PM)

MLA Ganpat Gaikwad vs Mahesh Gaikwad : अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील त्या जागेची मोजणी करण्यास भूमी अभिलेख विभागाने स्पष्टपणे मनाई केली होती. तरी देखील सोमवारी दुपारी पोलिसांच्या बंदोबस्ताविना एक बिल्डर आपल्या शंभरहून अधिक हत्यार बंद गावगुडांना घेऊन जागेचा सर्व्हे करण्यासाठी आला होता. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना देताच त्यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळ गाठलं होतं.

ambernath news ganpat gaikwad mahesh gaikwad land dispute shooting case builder goons and farmer gaikwad worker big storm

भाजप आमदार गोळीबार प्रकरणाचा वाद उफाळला,

follow google news

बातम्या हायलाइट

point

द्वारली गावातील जमिनीचा वाद पुन्हा उफाळला

point

सर्व्हेसाठी एक बिल्डर हत्यार गावगुंडांसह आला

point

पोलिसांनी हत्यारांसह गावगुंडांना ताब्यात घेतलं आहे

MLA Ganpat Gaikwad vs Mahesh Gaikwad land Dispute : शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यात अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील जमिनीवरून वाद निर्माण झाला होता. या वादातून गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातच महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोष्टीला सहा महिने झाले असून पुन्हा एकदा हा वाद उफाळला आहे. या जागेचा सर्व्हे करण्यासाठी एक बिल्डर गावगुंडांसह बंदुका आणि हत्यार घेऊन गेला होता. या घटनेची माहिती महेश गायकवाड यांना मिळताच त्यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी हत्यारांसह गावगुंडांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे जमिनीचा वाद उफाळण्याची शक्यता आहे. (ambernath news ganpat gaikwad mahesh gaikwad land dispute shooting case builder goons and farmer gaikwad worker big storm)

हे वाचलं का?

अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावातील त्या जागेची मोजणी करण्यास भूमी अभिलेख विभागाने स्पष्टपणे मनाई केली होती. तरी देखील सोमवारी दुपारी पोलिसांच्या बंदोबस्ताविना एक बिल्डर आपल्या शंभरहून अधिक हत्यार बंद गावगुडांना घेऊन जागेचा सर्व्हे करण्यासाठी आला होता. या घटनेची माहिती शेतकऱ्यांनी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांना देताच त्यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळ गाठलं होतं.

यावेळी महेश गायकवाड आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा बिल्डरच्या गावगुंडांची महेश गायकवाडांच्या समर्थक आणि शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलिसांनी बिल्डरांच्या गावगुंडांना ताब्यात घेतले होते. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : अर्ज करूनही 'त्या' महिलांना बसणार झटका, 3000 कसे जाणार हातचे?

आमच्या शेतावर त्यांनी सर्वे चालू केला. आम्ही अडवायला गेलो तर आम्हाला मारहाण करण्यात आली. आम्हाला रिव्हॉल्वर दाखवून धमकवण्यात आला. जितेंद्र पारिख सोबत 50 लोक होते हत्यार घेऊन होते. आम्ही महेश साहेबांना फोन केला ते आले आणि गुंडांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आमचे पैसे अजूनही दिले नाही त्यांनी पैशाचे जोरावर सातबारा फिरवून घेतले आहे असेही जमीन मालक यांनी सांगितले आहे. 

या प्रकरणी हिललाईन पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हा दाखल केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड, राहुल पाटील, अजय उर्फ बंटी गायकवाड, प्रशांत एकबोटेसह हिललाइन पोलिसांनी 14 नामांकित लोक आणि 60 अनोळखी लोकांविरुद्ध एकूण 74 जणांवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तर जमीन मालक ह्यांच्या तक्रारीवरून बिल्डर जितेंद्र पारीखसह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जितेंद्र पारीख यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत जमीन मालकांनी अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

माझ्याकडून 10 कोटीची खंडणी मागितली : बिल्डर 

या प्रकरणात जखमी बिल्डर जितेंद्र पारीख यांच्यावर कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेवर बिल्डर पारिख म्हणाले की, या जागेबाबत न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने आहे. काल जागेवर सर्वे करण्यासाठी गेलो होते. त्याठिकाणी महेश गायकवाड, राहुल पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी सर्वेला विरोध केला. त्यांच्याकडे बंदूका होत्या. आमच्या सोबत दादागिरी केली गेली. आम्हाला मारहाण करण्यात आली. आमच्याकडे हत्यारे नव्हती. तर आमच्या खाजगी सुरक्षा रक्षकांकडे लायसन्सधारी गन होती, असे त्यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Gold Price Today : बाप्पा पावला! गणेशोत्सवाआधी सोनं किती झालं स्वस्त?

पुढे पारिख  म्हणाले की, जागेविषयी कोणताही विवाद नाही. जागा आमचीच आहे. या जागेचा जो काही मोबदला आहे. तो दिला आहे. महेश गायकवाड हे गुंडगिरी करीत असून त्यांनी माझ्याकडून 10 कोटीची खंडणी मागितली आहे. आम्ही जातीवाचक शिवीगाळ केलेली नाही. एकच जागा तीन वेळा विकल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी सरकारने आम्हाला न्याय द्यावा.

बिल्डरचा खंडणीचा आरोप खोटा : महेश गायकवाड

या प्रकरणी महेश गायकवाड यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जागा शेतकऱ्यांची आहे. त्यांच्यासोबत दादागिरीकरुन बिल्डरांनी जागा लाटली आहे. आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देणार. बिल्डरने आमच्यावर केलेला खंडणीचा आरोप निराधार आणि खोटा आहे.

    follow whatsapp