Honeymoon ला जाण्यावरून वाद, कल्याणमध्ये सासऱ्याचा जावयावर Acid हल्ला

हनिमूनला काश्मिरला जाण्याऐवजी मक्का आणि मदिनाला जावं यासाठी आग्रही असलेल्या सासऱ्याने आपल्या जावयावर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे.

संतापलेल्या सासऱ्याने केला जावयावर ॲसिड हल्ला

संतापलेल्या सासऱ्याने केला जावयावर ॲसिड हल्ला

मिथिलेश गुप्ता

• 06:35 PM • 19 Dec 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

कल्याणमधील धक्कादायक घटना, Honeymoon ला जाण्यावरून वाद

point

संतापलेल्या सासऱ्याने केला जावयावर ॲसिड हल्ला

point

जखमी जावयावर उपचार सुरू, तर सासरा फरार

कल्याण : कल्याणमध्ये वादातून संतप्त सासऱ्याने आपल्या जावयावर ॲसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी सासरा हा फरार झाला असून, बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (argument over honeymoon father in law attacks son in law with acid in kalyan)

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम परिसरात ईबाद फाळके हे कुटुंबासह राहतात, महिनाभरापूर्वी याच परिसरात राहणाऱ्या जकी खोटाल यांच्या मुलीसोबत ईबादचा लग्न झालं होतं. लग्नानंतर इबादला हनिमूनसाठी काश्मीरला जायचे होते आणि त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती.

हे ही वाचा>> विवाहित महिलेची फेसबुकवर मैत्री.. निलंबित पोलिसाकडून हत्या

पण सासरे जकी खोटाल यांनी आपल्या जावयाला सांगितले की, 'तू काश्मीरला जाऊ नकोस, मक्का आणि मदिना येथे जा आणि तेथे नमाज अदा कर.'

गेल्या काही दिवसांपासून सासरे जकी आणि जावई ईबाद यांच्यात वाद सुरू होता. जकीला आपला जावई ऐकत नसल्याचा राग आला. याच वादातून जकीने काल (18 डिसेंबर) रात्री आठच्या सुमारास कल्याणच्या लालचौकी भागातून आपल्या घराकडे जात असलेल्या आपपल्या जावयावर थेट अॅसिड हल्ला केला.

हे ही वाचा>> Apps Ban in India : भारत सरकारने 'या' 14 Applications वर बंदी का घातली, काय होतं कारण? समोर आली धक्कादायक माहिती

संतापलेल्या जकी हा पहिले रिक्षात बसून इबाद जिथे होता तिथे आला आणि अचानक त्याच्यावर ॲसिड हल्ला केला. या हल्ल्यात इबाद हा गंभीर जखमी झाला आहे.
 
सध्या त्याच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी सासरा जकी हा घाबरला आणि त्याने घटनास्थळावपून पळ काढला. सध्या आरोपी सासरा हा फरार आहे. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून जकीचा शोध सुरू केला आहे.

    follow whatsapp