Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात कॉन्स्टेबल सस्पेंड, गोळीबारावेळी फटाक्यांच्या आवाजामुळे...

मुंबई तक

• 01:29 PM • 20 Oct 2024

Baba Siddique Case Update : बाबा सिद्दीकी यांच्यावर फायरिंग झाली, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत असणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल श्याम सोनवणे यांना सस्पेंड केल्याची माहिती समोर आली आहे.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल सस्पेंड

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल सस्पेंड

follow google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात कॉन्स्टेबल सस्पेंड

point

पोलिसांकडून मोठी कारवाई

point

पोलीस तपासात काय काय समोर आलं?

Baba Siddique Case Udpate मुंबई : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येला आता आठवडाभरापेक्षाही जास्त कालावधी उलटून गेलाय. मात्र अजूनही या प्रकरणात रोज एक नवी अपडेट येते आणि खळबळ उडवून देते. याप्रकरणात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या संशयीतांकडूनही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर असून, या प्रकरणाची कसून चौकशी केली जातेय. मात्र आता या प्रकरणात समोर आलेली अपडेट ही बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलशी संबंधीत आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, त्यावेळी सोबत असणाऱ्या पोलीस कॉन्टेबलवर आता कारवाई करण्यात आली. (baba Siddique security police constable suspended in case )

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Sanjay Raut : 20 ला निवडणूक, 23 ला निकाल, तर 26 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट? राऊतांचा थेट शाहांवर निशाणा

 

बाबा सिद्दीकी हे झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून निघाले असताना त्यांना अडवून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाराष्ट्रासह देश हादरला. कारण या घटनेची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानला येत असलेल्या धमक्या आणि त्यानंतर थेट सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आहे. त्यानंतर आता सलमान खानचेच नीकटवर्तीय असलेल्या बाबा सिद्दीकी यांना गोळीबार करुन संपवल्यानं या गँगची दहशत वाढल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात आता एक मोठी कारवाई  करण्यात आली असून, घटनेच्या वेळी बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला सस्पेंड करण्यात आलं आहे. 

कॉन्स्टेबलने काय सांगितलं होतं?

हे ही वाचा >>Shrikant Pangarkar: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदे गटात प्रवेश, 'या' पदावर केली नियुक्ती

बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलवर ही कारवाई करण्यात आली आहे.तसंच या कर्मचाऱ्याची चौकशी देखील केली जाणार आहे. सस्पेंड केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव श्याम सोनवणे असं असून, फायरिंग झाली त्यावेळी आजूबाजूला फटाके फूटत असल्यानं मला काही व्यवस्थित दिसलं नाही, त्यामुळे मला काहीच करता आलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

सोनवणे हे तीन पोलीस कॉन्स्टेबलच्या टीमचा भाग होते जे बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत तैनात असायचे. दिवसभर बाबा सिद्दीकी यांच्यासोबत दोन कॉन्स्टेल असायचे, तर रात्री मात्र एकच कॉन्स्टेबल सुरक्षेत असायचा. ज्यावेळी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्यावेळी सोनवणे हे एकटे नाईट शिफ्टला बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत होते.

    follow whatsapp