Beed Crime : बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांची मालिका अजूनही सुरूच आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातील वातावरण ढवळून निघालं. त्यानंतर बीडमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, आयुक्त बदलले, पालकमंत्री म्हणून अजित पवार आले. मात्र, गुन्हेगारीच्या घटना थांबलेल्या नाहीत. पुन्हा एकदा बीड जिल्हात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून दिवसाढवळ्या एका तरूणावर कोयत्याने वार करण्यात आले. या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> मोबाईल पाण्यात पाडल्याचा राग, 13 वर्षाच्या मुलाने थेट महिलेला दगडाने ठेचून संपवलं, 'त्या' प्रकरणाचा उलगडा
शॉर्ट फ्लिम बनवण्याचं काम करणाऱ्या तरूणावर सपासप वार केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती. त्यानंतर या तरूणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, गंभीर जखमा असल्यानं युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आईच्या फिर्यादीवरून चौघांजणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत्यूपूर्वी मुलगा काय म्हणाला, आईने सांगितलं...
राजकुमार साहेबराव करडे या अंबाजोगाईमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय युवकावर कोयता हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्याच्या गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर सपासप वार करण्यात आले होते. मुलाच्या आईने पोलीस फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, मुलगा राजकुमार करडे हा शॉर्ट फिल्म तयार करत होता. मागच्या दोन वर्षांपासुन मुलगा राजकुमार साहेबराव करडे हा चनई येथील वैष्णवी वैजनाथ शिंदे (अल्पवयीन आहे) यांचेसोबत फिल्म तयार करत होता. काम करता करता दोघांची मैत्री झाली प्रेम वाढत गेलं. दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले. मात्र, त्याच्या प्रेमाला वैष्णवी शिंदे हीचे वडील वैजनाथ शिंदे यांचा विरोध होता.
जातीमुळे त्यांचा लग्नाला विरोध
आईने सांगितलं की, मुलगा राजकुमार नेहमी मला म्हणायचा, माझे वैष्णवी शिंदेवर प्रेम असुन आम्ही लग्न करणार आहोत. पण आपली जात त्यांना समजल्यानं तिचे वडील आमचे लग्नाला विरोध करत आहेत. ते नेहमी मला वैष्णवीचा नाद सोड, नाहीतर तुला मारून टाकू अशा धमक्या देत असल्याचं मुलगा मला सांगायचा.
हे ही वाचा >> Viral Video: 'मालकाला कोंबड्याचे सगळे पैसे देऊन टाक, आणि सगळ्यांना...', रस्त्यावरून जाणारा कोंबड्यांचा अख्खा ट्रक अनंत अंबानींनी घेतला विकत!
1 एप्रिलला सकाळी साडे अकरा वाजता, मला आमचा शेजारी रफीक गवळी हा शेतात आला. रफीकने सांगितलं तुमचा मुलगा राजकुमारला मारलं, तो गंभीर जखमी झालाय आणि सरकारी दवाखाना अंबाजोगाई येथे उपचार घेत आहे असं सांगितलं. मी रफीक गवळीसोबतच सरकारी दवाखान्यात गेले. माझ्या मुलाच्या पाठीवर, हातावर, छातीवर गंभीर वार केलेले होते.
हल्ला कुणी केला?
आईने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, मुलगा राजकुमारला कोणी मारहाण केली असं विचारलं. त्यावेळी त्यानें वैष्णवी शिंदेचा भाऊ वेदांत शिंदे, आदीनाथ भांडे आणि अनोळखी एक जणाने कोयत्याने, काठीने मारहाण केली आहे असं सांगितलं.
कुठे घडली घटना?
दरम्यान, राजकुमार करडे हा पोखरी रोडवरील हॉटेल वृंदावन येथे सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास बसला होता. तिथेच वैजनाथ शिंदे यांचे सांगण्यावरुन वेदांत वैजनाथ शिंदे, आदीनाथ भांडे व अनोळखी एक जणाने कट रचून गाठलं आणि मारहाण केली.
त्यामुळे आता एकूणच या प्रकरणात काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
