विधवा सुनेवर सासऱ्याची वाईट नजर, लग्नाला विरोध करताच घडली भयंकर घटना

बिहारमध्ये एका चुलत सासऱ्याने सुनेला जबरदस्तीने कुंकू लावण्याचा प्रयत्न केला होता. त्याला विरोध करताच त्या महिलेचं मुंडन करुन गावातून धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bihar muzaffarpur father law beaten widow woman and paraded in village

bihar muzaffarpur father law beaten widow woman and paraded in village

मुंबई तक

28 Oct 2023 (अपडेटेड: 28 Oct 2023, 11:21 AM)

follow google news

Bihar Crime: बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये (Bihar Muzaffarpur) एक धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात एका चुलत सासऱ्याने आपल्या विधवा सुनेला जबरजस्तीने कुंकू लावला आहे. त्यानंतर कुंकू लावण्याला सुनेला विरोध केला म्हणून त्यानंतर त्याच सासऱ्याने सुनेचे मुंडन करुन गावातून तिची धिंड काढली आहे. सासऱ्याबरोबर काही लोकंही ही धिंड काढण्यात सहभागी झाले होते.

हे वाचलं का?

सासऱ्याने लावला कुंकू

या तिने विरोध केला असता आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी सुनेला मारहाण केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आले. महिलेच्या भांगामध्ये कुंकू भरून आणि तिने विरोध करताच तिची धिंड काढल्याप्रकरणी मुख्य आरोपी देवेंद्र मांझीला अटक केली आहे.

हे ही वाचा >> Pushkar Shotri: मराठमोळा अभिनेता पुष्कर श्रोत्रीच्या घरात प्रचंड मोठी चोरी, जिच्यावर ठेवला विश्वास तिनेच…

सुनेवर जबरदस्ती

महिलेला जबरदस्तीने कुंकू लावण्याचा प्रयत्न झाला. त्याआधी तिच्या त्या सासऱ्याने महिलेवर अत्याचारही केला होता. त्यानंतर तिला गाव सोडून जाण्याचीही जबरदस्ती करण्यात आली होती. विधवा महिलेने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून हे माझ्यावर अन्याय करत होते. आपली बदनामी होईल या भीतीने विधवा महिलेने ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती.

काही आरोपी फरार

पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, देवेंद्र मांझी, गुला मांझी, जय राम मांझी, शंभू मांझी, सोनू मांझी, जयलाल मांझी, अखिलेश मांझी आणि मिथिलेश मांझी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहो. तर यामधील काही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.कर्जा पोलिस स्टेशनचे प्रभारी राकेश कुमार राकेश यांनी सांगितले की, त्यांनी मुख्य आरोपी देवेंद्र मांझी याला अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तर गाव सोडून फरार झालेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

    follow whatsapp