VIDEO : ‘रिवॉल्वर रानी’! भर लग्नमंडपात नवरीने खऱ्या खुऱ्या बंदूकीतून झाडल्या गोळ्या

मुंबई तक

10 Apr 2023 (अपडेटेड: 10 Apr 2023, 08:35 AM)

Bride open fire in hathras video viral : एका नववधूने लग्न मंडपातून खऱ्या खुऱ्या बंदूकीने फायरींग (Bride open fire)केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Mumbaitak
follow google news

Bride open fire in hathras video viral : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडओ खुपच धक्कादायक असतात.असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका नववधूने लग्न मंडपातून खऱ्या खुऱ्या बंदूकीने फायरींग (Bride open fire)केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओचा पोलिसांनी तपास सुरु केला असून लग्नात वापरली गेलेली बंदूक नेमकी कोणाची आहे?याचा शोध घेतला जात आहे.(bride open fire in marriage police register case hatharas incident)

हे वाचलं का?

व्हिडिओत काय?

सोशल मीडियावर लग्नातले अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.यामध्ये नातेवाईक डान्स करत असताना अथवा नवरा-नवरी लग्नातील एंट्रीच्या व्हिडिओचा समावेश असतो. मात्र हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. या व्हिडिओत नववधू (Bride open fire) बंदूक हातात घेऊन गोळ्या झाडताना दिसतये. खरं तर व्हिडिओत दोघा नवरा-नवरीने एकमेकांना हार घातला.नंतर दोघेही जाऊन नवरा नवरीच्या खुर्च्यावर बसले होते. यावेळी नवरीच्याच बाजूला उभा असणारा एक तरूण तिच्या शेजारी येतो आणि तिच्या हातात बंदूक घेतो. ही बंदूक घेऊन भर लग्नमंडपात नववधू आकाशात चार राऊंड फायरींग करते. यावेळी तिचा नवरा शेजारी बसलेला असतो. या लग्नातला हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : ओठांचं चुंबन, जीभही… दलाई लामा यांच्या वादग्रस्त व्हिडीओने खळबळ

नवरा नवरीने एकमेकांना हार घातल्यानंतर ही घटना रात्री 11 च्या दरम्यान घडली आहे. नवरा नवरीने रिसेप्शन (Marriage reception) सुरु होते. यावेळी अनेक नातेवाईक नवीन जोडप्यासोबत फोटो काढत होते. या दरम्यान एक काळी शर्ट घातलेला तरूण स्टेजवर येतो आणि नवरीच्या हातात बंदूक देतो, त्यानंतर नवरी आकाशात चार राऊंड फायर करते. ही संपुर्ण घटना एका कॅमेरात कैद झाली होती. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला होता. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हाथरस (Hathras) जंक्शन परिसर क्षेत्रात एक गाव आहे. या गावातूनच ही वरात आली होती. या व्हिडिओत ज्या तरूणाने नवरी्च्या हातात बंदूक दिली आहे, तो मुलगा मुलीकडचा होता. या प्रकरणात व्हिडिओच्या आधारावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच नवरीच्या कुटुंबियांची चौकशी केली जाणार आहे. ज्या मुलाने लग्नात बंदूक दिली होती, त्याचाही तपास करण्यात येत आहे, अशी माहिती एएसपी अशोक कुमार सिंह यांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरस (Hathras)जिल्ह्यातही घटना घडली आहे. या घटनेचा पोलिस कसून तपास करतायत.

    follow whatsapp