CM Devendra Fadnavis : "संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळणार..", सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय

मुंबई तक

20 Dec 2024 (अपडेटेड: 20 Dec 2024, 03:20 PM)

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत.

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती आली समोर

point

CM देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुखांच्या हत्येची सांगितली A to Z स्टोरी

point

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. देशमुखांचं 9 डिसेंबरला अपहरण करून हत्या करण्यात आली होती. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतलीय. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT)  आणि न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत. तसच या प्रकरणी बीडचे पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात आलीय, असं फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनात म्हटलं आहे. 

हे वाचलं का?

मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात या प्रकरणी दिलेली माहिती अशी की, बीडमधील वाईंड मील पॉवर सेक्टरमध्ये अवाडा ग्रीन एनर्जीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचं समोरं आलंय. अशोक नारायण घुले, प्रतिक घुले आणि इतर आरोपींनी अवाडा ग्रीन एनर्जी कार्यालयात जाऊन वॉचमन आणि कामगारांना मारहाण केली. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.

हे ही वाचा >> Kalyan Marathi Family: 'मराठी लोक भिकारडे...', परप्रांतीयाची मराठी कुटुंबाला हिणवत तुफान मारहाण

त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांना स्कॉर्पिओ कारने अडवले आणि त्यांना वायरच्या माध्यमातून कारमध्ये टाकण्यात आले. त्याचदरम्यान देशमुखांची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. संतोष देशमुखांचा भाऊ आरोपी विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. संतोषला काही वेळानंतर सोडून देण्यात येईल असं सांगण्यात आलं. परंतु, आरोपींनी संतोषची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी 6 डिसेंबरला प्रकल्प व्यवस्थापक थोपटेंनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सोनावणे यांनी दुसरी तक्रार दाखल केल्यानंतर अॅट्रोसिटी सेक्शनची नोंद करण्यात आली.

रिपोर्टनुसार, वाल्मिक कराड यांनी प्रकल्प व्यवस्थापक थोपटेंना धमकी दिली होती. अवाडा ग्रीन एनर्जीचे काम थांबवण्यासाठी ही धमकी देण्यात आली होती. एकतर काम थांबवा नाहीतर काम सुरु ठेवण्यासाठी दोन कोटी रुपये द्या, अशी खंडणीची मागणी करण्यात आली होती.
या प्रकरणात जो कोणी मास्टरमाईंड असेल, त्याच्यावर कारवाई होईल. वाल्मिक कराडच्या विरोधात पुरावे दाखल झाल्यास गुन्हे दाखल केले जातील. शरद पवार यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता जरी असला, तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशाप्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सरकारकडून कोणत्याही प्रकारचं दुर्लक्ष केलं जाणार नाही. बीडमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. अशाप्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर मकोक्का (MCOCA) लावण्यात येईल.

हे ही वाचा >> 20 December 2024 Horoscope : 'या' राशीच्या प्रेमी युगुलांना मिळणार आनंदाची बातमी! काहींना नोकरीची सुवर्ण संधी

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतले 'हे' निर्णय

या प्रकरणी विशेष तपास पथक (IG अधिकारी) नेमण्यात आले आहेत.
या हत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीही करण्यात येईल.
या प्रकरणाचा तपास 3-6 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाईल.
या प्रकरणाची कायदेशीर पद्धतीत योग्य चौकशी न केल्याने बीडच्या पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात आलीय.

    follow whatsapp