Crime : डेटिंग अ‍ॅपवर भेट, ऑफिसमध्येच केला बलात्कार, व्हिडीओ बनवून 26 वर्षीय…

अमोलने टाकलेल्या लग्नाच्या मागणीवर विवाहितेने नकार देताच त्याने तिच्यावर ऑफिसातच बलात्कार केला. यासह पिडितेचे फोटो आणि व्हिडिओ देखील काढून घेतले. तसेच या घटनेची माहिती कुणालाही देताच जीवे मारण्याची धमकी दिली.

crime news sambhaji nagar 26 year old married women rape case government cotractor accuse shocking crime story

crime news sambhaji nagar 26 year old married women rape case government cotractor accuse shocking crime story

प्रशांत गोमाणे

• 07:35 AM • 14 Jan 2024

follow google news

Crime News : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 26 वर्षीय विवाहितेवर बलात्काराची घटना घडली आहे. काम देण्याच्या बहाण्याने ऑफिसात बोलावून विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली. यावेळी तिचे अश्लील छायाचित्र आणि व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार बलात्काराचा केल्याचाही प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित विवाहितने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. य तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने जिल्हा हादरला. (crime news sambhaji nagar 26 year old married women rape case government cotractor accuse shocking crime story)

हे वाचलं का?

पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित विवाहितेचे 2022 मध्ये मुस्लिम मुलासोबत लग्न झाले होते. या लग्नानंतर दोघांमध्ये अजिबात पटत नसल्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एप्रिल 2022 पासून विवाहिता एकटीच राहत होती. ती पेशाने एक शिक्षिका होती. 2018 पासून ती खाजगी शिकवणीत शिक्षिका म्हणून काम करत होती. त्यात आता नवऱ्यापासून विभक्त झाल्यापासून ती कामाच्या शोधात होती.

हे ही वाचा : Milind Deora : शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यामागे देवरांचा ‘हा’ आहे खरा प्लॅन?

या दरम्यान विवाहितेने टिंडर डेटिंग अ‍ॅपवर तिचे खाते उघडले होते. या अ‍ॅपवर तिची ओळख अमोल पाटीलशी झाली होती. अमोल हा शासकिय कंत्राटदार होता. मे 2023 मध्ये अमोलने तिला फोन केला व बायोडेटा घेऊन त्याच्या कार्यालयात बोलावले होते. यावेळी विवाहिता ऑफिसमध्ये पोहोचताच अमोलने तिला त्याचे दु:ख सांगत लग्नाची मागणी घातली. माझी पत्नी मला सोडून नाशिकला राहते. मी सध्या आई-वडील आणि भावासोबत राहतो. आपण काही दिवसांनी लग्न करू असे अमोलने पीडित विवाहितेला सांगितले होते.

अमोलने टाकलेल्या लग्नाच्या मागणीवर विवाहितेने नकार देताच त्याने तिच्यावर ऑफिसातच बलात्कार केला. यासह पिडितेचे फोटो आणि व्हिडिओ देखील काढून घेतले. तसेच या घटनेची माहिती कुणालाही देताच जीवे मारण्याची धमकी दिली.या धमकीने महिलेने पोलिसात तक्रार दिलीच नाही. याच गोष्टीचा फायदा घेऊन अमोलने वारंवार तिच्यावर बलात्कार केला.

हे ही वाचा : Ayodhya Ram Mandir: कोण आहेत हे 4 शंकराचार्य? राम मंदिरावेळीच त्यांची का होतेय चर्चा?

यानंतर अमोलने पुढे पीडित विवाहितेला दर्गा भागात बोलावून घेतले. त्यानंतर तिला एमजी हेक्टर गाडीमधून आडगाव फाट्यावर नेऊन तिच्यावर कारमध्येच बलात्कार केला. यानंतर देखील आरोपीने ऑफिसात बोलावून तिच्यावर वारंवार बलात्कार केला तिला बेल्टने देखील मारहाण केली होती.

अखेर आरोपीच्या या अत्याचाराला कंटाळून पीडितेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात 12 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

    follow whatsapp