Sexual Harassment Case : गुरुग्राममध्ये (Gurugram) एका 30 वर्षीय महिलेने आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार (Harassment) केल्याची घटना उघड झाली आहे. पती आणि नातेवाईकांना अडकवण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पीडित मुलीचे वय 13 वर्षे आहे. पोलीस तपासात सर्वकाही उघड झालं आहे. मुलीनेही वैद्यकीय तपासणीसाठी आईविरोधात जबाब नोंदवला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला उत्तर प्रदेशातील अलीगढची रहिवासी आहे. 2018 मध्ये, ती तिच्या पहिल्या पतीपासून वेगळी झाली आणि तिच्या दोन मुली आणि दोन मुलांसह गुरुग्रामला आली. त्यानंतर 2021 मध्ये तिने दुसरे लग्न केले. दुसरा पती हरियाणाचा असून तो खासगी ट्रक चालक म्हणून काम करतो. महिला स्वत: सेक्टर 10 मधील एका फर्ममध्ये काम करते.
वाचा : CM शिंदेंची हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा, म्हणाले ‘ही’जबाबदारी सरकारचीच
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने तिचा पती, पतीचा भाऊ आणि चुलत भावाविरुद्ध दोन वेगवेगळ्या एफआयआरमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने पती आणि कुटुंबावर कोणते आरोप लावले?
महिलेने ऑक्टोबरमध्ये पहिला गुन्हा दाखल केला होता. यामध्ये तिने नवरा आणि त्याच्या चुलत भावावर मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला.
दुसरा गुन्हा 16 डिसेंबर रोजी महिला पोलीस ठाण्यात दाखल झाला. 13 डिसेंबर रोजी दुपारी तिच्या मोठ्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ फेकून दिल्याचा हा आरोप आहे. महिलेने हे आरोप पतीचा भाऊ, चुलत भाऊ आणि अज्ञात व्यक्तीवर केले आणि एफआयआर दाखल केली.
वाचा : Mla Disqualification: फडणवीस-पवारांचा पहाटेचा शपथविधी शिंदेना भोवणार? ठाकरेंच्या वकिलांनी गाठलं खिंडीत
पोलिस तपासात काय उघड झाले?
पहिल्या घटनेच्या दिवशी तिचा नवरा उज्जैनमध्ये असल्याचे पोलीस तपासात उघड झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याच्या ट्रकचे जीपीएस लोकेशन आणि त्याच्या फोनच्या टॉवर लोकेशनवरून तो शहरात नसल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, दुसऱ्या घटनेच्या वेळी मुलगी तिच्या लहान भावासोबत किराणा दुकानात गेली होती आणि घरी परतली होती. हे आरोपी घटनेच्या दिवशीही शहराबाहेर असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलीस उपायुक्त वीरेंद्र विज यांनी सांगितले की, आरोपींच्या चौकशीदरम्यानही त्यांच्याविरुद्ध कोणतेही ठोस पुरावे मिळाले नाहीत. आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आर्थिक पाठबळ देत नसल्यामुळे ती महिला पतीवर रागावली होती आणि तिला बदला घ्यायचा होता.
वाचा : ‘…तर जेलमध्ये जाल, मॉब लिंचिंग करणाऱ्यांना थेट फाशीच’, अमित शहांची मोठी घोषणा
पीडित मुलीने जबाबात काय सांगितले?
पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीने काउंसिलिंगदरम्यान सांगितले की, तिच्या आईने तिला अशा प्रकारे मारहाण केली की ते बलात्कारासारखे दिसेल. मुलीने असेही सांगितले की तिच्या आईने तिला पोलिसांना खोटी गोष्ट सांगण्यास सांगितले होते.
माहितीनुसार, तपास सुरू असताना महिलेवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अल्पवयीन मुलीच्या साक्षीच्या आधारे महिलेवर गुन्हा नोंदवण्याची गरज आहे की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
ADVERTISEMENT