Mumbai Airport : थोडं थोडकं नाही तर तब्बल 11 कोटींचा गांजा, दीड कोटींचं सोनं जप्त, कसं लपवलं होतं ते ऐकून थक्क व्हाल

मुंबई तक

21 Dec 2024 (अपडेटेड: 21 Dec 2024, 12:40 PM)

नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवायांबद्दल त्यांचं कौतुक केलं होतं.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई

point

सीमा शूल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची कारवाई

मुंबई विमानतळावरील (CSMI) सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 20 डिसेंबरच्या रात्री बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाकडून तब्बल 11 कोटी रुपयांहून अधिक किमतीचा गांजा जप्त केलाय. या प्रवाशाला 11.322 किलो संशयित हायड्रोपोनिक गांजासह पकडण्यात आलं, ज्याची किंमत तब्बल 11.32 कोटी रुपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रवाशाची प्रोफाइल तपासली. त्यानंतर प्रवाशाच्या ट्रॉली बॅगमध्ये व्हॅक्यूम-सीलबंद प्लास्टिकच्या पाऊचमध्ये लपवून ठेवलेला अवैध पदार्थ जप्त केला. हायड्रोपोनिक मारिजुआना हा मादक पदार्थ कॅनाबिसचा उच्च दर्जाचा प्रकार मानला जातो. त्याची किंमतही भरपूर असते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: धनंजय मुंडेंनी थेट केली फाशीची मागणी, वाल्मिक कराडबद्दल काय म्हणाले?

एक दिवस आधीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवायांबद्दल त्यांचं कौतुक केलं होतं. 1.48 कोटी रुपयांचे 2 किलो पेक्षा जास्त तस्करीचे सोने जप्त केल्याबद्दल हे कौतुक करण्यात आलं होतं. '@mumbaicus3 च्या मेहनतीचं कौतुक आहे. चांगलं काम केलं. असं म्हणत त्यांनी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीवर थाप दिली होती.

दोन किलोपेक्षा जास्त किमतीचे सोनं जप्त
 

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: "वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं...", जितेंद्र आव्हाडांच्या विधानाने खळबळ

मुंबई विमानतळावरील सीमाशुल्क विभागाला 18-19 डिसेंबर दरम्यान सोन्याच्या तस्करीची दोन प्रकरणं आढळून आली. अधिकाऱ्यांनी एकूण 2.073 किलो 24 कॅरेट सोने जप्त केलं, ज्याची नवीन पद्धतींनी तस्करी केली जात होती. मुंबई कस्टम्सने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, '18-19 डिसेंबर 2024 रोजी, CSMI विमानतळ, मुंबई येथील अधिकाऱ्यांनी 2 प्रकरणांमध्ये 1.48 कोटी रुपये किमतीचे 2.073 किलो सोने जप्त केले. हे सोनं प्रवाशाने त्याच्या शरिरात लपवलं होतं, तर दुसऱ्या प्रकरणात हे सोनं विमानतळावरील कर्मचाऱ्याकडूनच जप्त करण्यात आलं होतं. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती.

    follow whatsapp