Mumbai Crime News : मुंबईच्या गोवंडीतून नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका बापानेच (Father) लेकीवर (Daughter) अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल दोन वर्ष हा नराधम बाप लेकीवर अत्याचार करत होता. या घटनेत वडिलांचे अत्याचार वाढताच मुलीने नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी शिवाजी नगर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर नराधम बापावर पॉक्सो, लैगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीलाी अटक करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (daughter was raped by her father for two years shocking crime story govandi mumbai)
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गोवंडीत 13 वर्षीय मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. दरम्यान ही मुलगी घरात एकटी असताना वडिलांची तिच्यावर वाईट नजर पडली होती. वडिलांनी लेकीवर घरातच बलात्कार केला. या बलात्कारानंतर वडिलाने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुला जीवे ठार मारेन अशी धमकी मुलीला दिली.
हे ही वाचा :Navi mumbai Crime : मॅट्रिमोनियल साईटवर भेट, महिलेला भुलवून घेऊन गेला हॉटेलवर; नंतर…
या धमकीमुळे मुलीने घाबरून या घटनेची वाच्यता कुठेच केली नाही. याचाच फायदा उचलत बापाने मुलीवर बलात्कार सुरुच ठेवला. ज्या ज्या वेळेस मुलगी घरी एकटी असायची, त्या त्या वेळेस नराधम बाप मुलीवर बलात्कार करायचा. असे साधारण दोन वर्ष मुलीसोबत घडतं होते. आणि या घटनेची वाच्यता तिने कुठेच केली नव्हती.
वडिलांच्या या सततच्या बलात्काराच्या घटना पाहून मुलीने हिम्मत करून या घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना दिली. यानंतर नातेवाईकांनी पीडीत मुलीसह शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठून नरामध बापाची पोलिसात तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी पॉक्सो, लैगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवत आरोपीलाी अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ADVERTISEMENT