Delhi Murder : दिल्लीतील एका हत्याकांडाचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर त्या क्रूर घटनेमुळे दिल्ली हादरून गेली आहे. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये (cctv) 2 मिनिटे 8 सेकंदाची दिसत असली तरी ते पाहणाऱ्याला त्या घटनेचा संताप आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांसह अनेकजणांना आता धक्का बसला आहे. (delhi minor stabbed youth 57 times knife attack danced after the murder video viral brutal murder)
ADVERTISEMENT
व्हायरल व्हिडीओ भयानक
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर चाकूने सलग वार केले आहेत. ते वार सुरु असताना ती व्यक्ती मृत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण त्या व्हिडीओमध्ये ओढत आणलेल्या व्यक्तीजवळच हल्ला करणारी व्यक्ती डान्स करत आहे. ही घटना घडत असताना लोकांनी मध्यस्थीही करण्याचा प्रयत्न केला मात्र चाकूच्या धाकामुळे त्याच्यासमोर येण्याचं कोणीच धाडस करताना दिसत नाही.
क्रूर पद्धतीने हत्या
व्हिडीओमध्ये दिसत असलेले दृश्य इतके भयानक आहे की, आरोपीकडून मृताचे केसाला धरुन तो फरफटत आणत आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडत आहे तिथे कदाचित कोणीच राहत नाही. कारण त्या व्यक्तीला फरफटत घेऊन जात असताना तिथे कोणीच दिसत नाही. ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी दिल्ली पोलिसही उशिरा पोहचले होते. त्यामुळे आता अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. कारण त्याने हे कृत्य एवढ्या उघडपणे कसे केले आहे असा सवाल विचारला जात आहे.
मजदूर कॉलनी हादरली
जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो व्हिडीओ दिल्लीतील वेलकम परिसरातील आहे. त्या व्हिडीओमध्ये वेळ आहे 10 वाजून 20 मिनिटे 52 सेकंदाची. नेमकी घटना घडली ते ठिकाण आहे मजदूर कॉलनीतील आणि तारीख होती 21 नोव्हेंबर. 2 मिनिटे 8 सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या केसाला धरून फरफटत आणत आहे. त्यानंतरही ती व्यक्ती त्या मृतदेहावर सपासप वार करताना दिसत आहे.
हे ही वाचा >> MLA Disqualification : ‘ही पद्धत पक्षपाती”, ठाकरे गटाचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप
10 मिनिटात 12 वार
त्या व्हिडीओमध्ये 10 वाजून 21 मिनिटे 7 सेकंद झालेली असतानाच त्याच्याकडून 12 वेळा चाकूने सपासप वार केले आहेत. तेवढ्यावरच तो न थांबता त्याने तिथेच डान्सही केला आहे. डान्स करुन त्याने पुन्हा त्याच्यावर वार केले आहेत. त्याचवेळी त्याला कोणीतरी विरोध करताना दिसत आहे, म्हणून तो त्याच्याकडे धावत जाताना दिसत आहे.
धाडस कोणी केले नाही
इतक्या क्रूर पद्धतीने त्या व्यक्तीवर हल्ला होत असताना त्याला कोणीतरी विरोध करताना त्याने पुन्हा तेथे येऊन त्याच्यावर हल्ला चढविला आहे. एवढं होत असतानाही त्या गल्लीमध्ये कोणाचीही ये जा होताना दिसत नाही. एकाने गेट उघडले आहे मात्र पुन्हा ते घाबरून बंद होतानाही दिसत आहे. हल्लेखोर व्यक्ती त्याचे केस ओढत आहे, त्याला लाथाबुक्या घालत आहे. तर कधी त्याच्यावर चाकूने सपासप वार करत आहे, इतक्या क्रूर पद्धतीन तो हल्ला करत आहे.
आरोपी अल्पवयीन
दिल्लीतील ईशान्य भागात घडलेल्या या घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे मात्र सगळ्यात धक्कादायक बाब ही आहे की, 350 रुपयांची लूट करण्यासाठी इतक्या वाईट पद्धतीने 16 वर्षाच्या मुलाने 18 वर्षाच्या युवकाची हत्या केली आहे. त्यामुळे हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाल्यानंतर मात्र पोलिसही हादरून गेले आहेत. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याने इतक्या क्रूर पद्धतीने हत्या का केली आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
ADVERTISEMENT