Crime :
ADVERTISEMENT
दिल्लीच्या गोकुळपूरी भागात वृद्ध दाम्पत्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांड प्रकरणात वृद्ध दाम्पत्याची सून मोनिका हिला अटक केली आहे. सासू-सासऱ्यांच्या बंधनांमुळे प्रियकर आशिषला भेटू शकत नव्हती. यातूनच 4 महिन्यांपूर्वी मोनिका आणि आशिष यांनी सासू-सासऱ्यांच्या हत्येचा कट रचला. आशिषने दुसऱ्या एका साथीदाराला सोबत घेवून दोघांची हत्या केली. पण एका फोनने आणि सीमकार्डने पोलिसांना आरोपींपर्यंत पोहचण्यास मदत केली. सध्या आशिष फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Daughter-in-law killed elderly mother-in-law and father-in-law in Delhi’s Gokulpuri area)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिल्ली पोलिसांच्या मते, गोकुळपूरी भागात सोमवारी एका घरात वृद्ध दाम्पत्याची लूटमार करुन हत्या करण्यात आली. सोमवारी सकाळी 7:30 वाजता वृद्ध दाम्पत्याच्या मुलाने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्रकरणाचा तपास सुरु केला. प्राथमिक तपासात पोलिसांना कळून आलं की, हल्लेखोरांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला नव्हता. अत्यंत सहजपणे त्यांनी घरात प्रवेश केल्याचं दिसून येत होते. यामुळे पोलिसांना घरातील लोकांवर हत्येचा संशय आला. अशात पोलिसांनी दाम्पत्याच्या मुलाशी आणि सुनेशी वेगवेगळी चौकशी केली.
Crime: 17 वेळा प्रेग्नेट, रक्तापासून केक तर मृतदेहापासून… हादरवून टाकणारी कहाणी
पाच महिन्यांपूर्वी रचला कट :
मोनिकाला प्रश्न विचारले असता ती नीट उत्तर देऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. यानंतर तिचा मोबाईल तपासला असता आशिष नावाच्या तरुणाशी अनेकवेळा फोनवरून बोलणे झाल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी विचारले असता तो आपला जवळचा नातेवाईक असल्याचं उत्तर मोनिकाने दिलं. पण पोलिसांना विश्वास बसत नसल्याने त्यांनी मोनिकाची कसून चौकशी केली, त्यानंतर तिने दुहेरी हत्याकांड कसं घडवून आणलं याबद्दल पोलिसांना माहिती दिली.
मोनिकाने पोलिसांना सांगितले की, 2020 मध्ये तिची आशिषशी फेसबुकवरून मैत्री झाली होती. काही दिवसांनी मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विवाहित असूनही मोनिका आशिषला हॉटेलमध्ये भेटत असे. दोघेही फोनवर खूप बोलायचे.
Crime: पत्रकार म्हणून मिरवलं, पण डान्स बारने सारं काही हिरवलं; पैशासाठी…
अशात मोनिकाच्या नवऱ्याने एक दिवस तिचा मोबाईल तपासला. यात तिच्या आणि आशिषच्या गप्पा समोर आल्या. यानंतर पती आणि सासूने तिचा फोन काढून घेतला आणि तिच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर तिला घराबाहेर पडण्यापासूनही बंधन घातलं. मोनिकाला स्मार्ट फोनऐवजी एक साधा फोन देण्यात आला.
मोनिकाच्या या वागण्यामुळे तिच्या सासरच्यांनी घर विकून द्वारकेला राहायला जाण्याचा निर्णय घेतला. मोनिकाने सांगितले की, सासू-सासऱ्यांच्या या बंधनांमुळे आशिषला भेटू शकत नव्हती. सासरच्या मंडळींमुळे आशिषला भेटता येणार नाही, असं मोनिकाला वाटू लागल्याने ती अस्वस्थ झाली होती. अशा स्थितीत डिसेंबरमध्येच मोनिकाने आशिषसह वृद्ध जोडप्याला मार्गातून हटवण्याचा कट रचला. त्यानंतर अनेक प्रयत्नांनंतर फेब्रुवारी महिन्यात दोघेही दोनदा भेटले.
नवीन सिमवर चालायच्या दोघांच्या गप्पा :
कटानुसार दोघांनी 2 नवीन सिमकार्ड घेतले. मोनिका आणि आशिष या नंबरवरून बोलत होते. फोनवर बोलून दोघांनी वृद्ध दाम्पत्याच्या हत्येसाठी रविवारचा दिवस निवडला. आशिष आणि त्याचा साथीदार रविवारी रात्री सात वाजता मोनिकाच्या घरी पोहोचले. मोनिकाने घराचा दरवाजा उघडून दोघांना आत घेतले. यानंतर दोघेही छतावर लपले. इथेच मोनिकाने दोघांच्या नाश्त्याचीही व्यवस्था केली.
Crime : पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयावरून मित्राची केली हत्या
रात्री 10.30 वाजेपर्यंत घरातील सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. या दरम्यान, आशिषने मोनिकाच्या नवीन नंबरवर कॉल करून तिला रूम न सोडण्यास सांगितले. यावेळेत आशिष आणि त्याच्या साथीदाराने दाम्पत्याची हत्या करून दरोडा टाकला. यानंतर आशिषने पुन्हा मोनिकाला फोन करून आपण घर सोडत असल्याचं कळविलं. त्यानंतर ती सकाळी उशिरा उठली. सोमवारी सकाळी मोनिकाच्या पतीला जाग आली तेव्हा आई-वडिलांचा खून झाल्याचे पाहून तो घाबरला. यानंतर त्याने मोनिकाला उठवले. दोघांनी पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी मोनिकाला अटक केली आहे. तर तिच्या प्रियकराचा शोध सुरू आहे.
ADVERTISEMENT