Uddhav Thackeray On CM Eknath Shinde: "ही महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही अशी ही निवडणूक आहे. आम्ही उघड उघड लढतो आहोत. तुम्ही जर त्यांना चोरून पाठिंबा देणार असाल, तर दुर्देवाने तुम्ही सुद्धा महाराष्ट्रद्रोही आहात. शिवसेनेनं हे चाळे कधी केले नाहीत. राजकीय वैमनस्य असेल तर उघडपणे करायचं. आज शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन आहे. काही जाहीराती या गद्दारांनी दिल्या आहेत. गद्दारा पहिले तू माझ्या वडिलांचा फोटो वापरायचा सोड. नामर्दाची औलाद तुझ्यात हिंमत असेल तर स्वत:च्या वडिलांचा फोटो लाव आणि मग मत मागायला ये. मग कसे जोडे खातो ते बघ", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
"गद्दारी..गद्दारी..किती गद्दारी आणि पाटणशी गद्दारी..कोण म्हणतं उद्धव ठाकरे शिवसेना ही काँगेससोबत गेली. म्हणून आम्ही गद्दारी केली. इथले जे लुटमार मंत्री आहेत. पालकमंत्री कसले, पालक जर का खायला लागले तर ते लुटमार मंत्री आहेत. त्यांना विचारायचंय, तुमचे आजोबा काँग्रेसमधूनच मंत्री होते, मग तेव्हा तुम्हाला दिसलं नाही का, काँग्रेसचं काय झालं? मग त्यानंतर यांना काँग्रेसमध्ये कुणी विचारत नव्हतं. मग कळपासोबत आमच्याकडे घुसले. आपल्याला पण दया आली. कारण बाळासाहेब देसाई आणि शिवसेनाप्रमुखांचे ऋणानुबंध तेव्हा होते. म्हणूनव त्यांना घेतलं. पण आम्हाला काय माहिती, असा लुटमार करणारा करंटा असेल. आपण मंत्री केला. पण मिंध्याने परवा सांगितलं की, जी गद्दारी झाली त्यात हाच लांडगा पुढे होता. दुसरा महेश शिंदे होता", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शंभुराज देसाईंवह अप्रत्यक्षपणे टीका केली.
हे ही वाचा >> Amit Shah : विदर्भातले सगळे दौरे रद्द, अमित शाह तातडीने दिल्लीला रवाना, नेमकं कारण काय?
"शिवसेना म्हणजे काय गांडुळांची औलाद आहे? असं तुम्हाला वाटतं. म्हणजे शिवसेनेनं मंत्री केलं तेव्हा शिवसेनेत. आता गद्दारांबरोबर जाऊन मंत्री होणार म्हणून तिकडे. जो करेल मला मंत्री, त्याचा होणार मी वाजंत्री. बस वाजंत्री वाजवत. हर्षद म्हणाला साहेब मी एकटा लढतोय. अरे एकटा कुठे मी आहे ना तुझ्यासोबत. जनता आहे. तीन उमेदवारांमध्ये एक आहे लुटमार मंत्री.
हे ही वाचा >> Navneet Rana: अमरावतीत प्रचार रॅलीत नवनीत राणांवर हल्ला! नेमकं घडलं तरी काय?
ज्याने घरच्या लग्नासाठी एक्साईज (राज्य उत्पादन शुल्क) लुटलं. अधिकारी वापरले. पैसे वापरले. असं काही समजू नका. त्यांच्या दुर्देवाने मी सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो. माझे सुद्धा प्रशासकीय विभागात काही संबंध आहेत. पैशांचा वापर कसा झाला, पैसे कुठे गेले? हे मला सांगत असतात. जरा थांबा. आमची सत्ता आल्यानंतर ही सर्व प्रकरणं मी कशी मार्गी लावतो ते बघा. लुटमार मंत्र्यांनी पैसे लुटलेत. जनतेला आणि महाराष्ट्राला लुटलंय. त्या लुटमारीचे पैसे वाटून पुढची तयारी करत आहेत", असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT