Navneet Rana: अमरावतीत प्रचार रॅलीत नवनीत राणांवर हल्ला! नेमकं घडलं तरी काय? 

मुंबई तक

17 Nov 2024 (अपडेटेड: 17 Nov 2024, 01:09 PM)

Navneet Rana Latest News:  विधानसभा निवडणुकीची  रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीसह महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच पक्षाचे नेते प्रचाराचा नारळ फोडून कार्यकर्त्यांना मतदानाचं आवाहन करत आहेत.

Attack On Navneet Rana In Amravati

Attack On Navneet Rana In Amravati

follow google news

बातम्या हायलाइट

point

माजी खासदार नवनीत राणांच्या सभेत राडा!

point

40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल

point

नवनीत राणा माध्यमांशी बोलताना काय म्हणाल्या?

Navneet Rana Latest News:  विधानसभा निवडणुकीची  रणधुमाळी सुरु असतानाच महायुतीसह महाविकास आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अशातच पक्षाचे नेते प्रचाराचा नारळ फोडून कार्यकर्त्यांना मतदानाचं आवाहन करत आहेत. परंतु, अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा क्षेत्रातील खल्लार गावात विशिष्ट समुदायातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं समोर आलंय. भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणांवर हल्ला झाल्याचं समोर आलंय. राणा त्यांचे पती रवी राणांसोबत युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदिले यांचा प्रचाराचं समर्थन करत होत्या. यावेळी त्यांच्या प्रचारसभेत राडा झाला आणि जमावाने राणांच्या दिशेनं खुर्च्या फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. 

हे वाचलं का?

नवनीत राणांनी माध्यमांशी बोलतान म्हटलं, मी जेव्हा भाषण देत होती. तेव्हा विशिष्ट समुदायातील लोकांनी अश्लील हातवारे करून अल्लाह हू अकबरच्या घोषणा दिल्या. माझं भाषण संपल्यावर त्या लोकांनी आमच्या दिशेनं खुर्च्या फेकल्या. माझ्या सुरक्षा रक्षकांनी मला कारजवळ व्यवस्थीत नेलं. हिंसक जमावाने शिवीगाळ करत माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा >> Shivdi Vidhan Sabha : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... मनसे आणि ठाकरेंच्या उमेदवाराच्या भेटीची चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये  40 ते 50 लोकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक केली नाही, तर हिंदू संघटनेकडून आंदोलन केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. तसच घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

हे ही वाचा >> Nagpur : निवडणुकीच्या तोंडावर नागपूरमध्ये 14 कोटींचं सोनं जप्त, गुजरातहून आणल्याची माहिती

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकारण चांगलच तापलं आहे. विशिष्ट समुदायातील नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दर्यापूर मतदारसंघात महायुतीच्या शिंदे गटाकडून अभिजीत अडसूळ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर आमदार रवी राणा यांच्या स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेल अडसूळांविरोधात निवडणूक लढत आहेत. निवडणुकीच्या मतदानापूर्वीच दोन्ही गटात तुफान राडा झाल्यानं मतदारांचा कौल कोणाला मिळतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

    follow whatsapp