Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. सोमवारी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. यादरम्यानच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्यानं पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. भाजपसोबत महायुतीमध्ये निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही शरद पवार यांच्याच विचारावर चालतो आहोत. राज्यात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्यांनाच लोक जास्त पसंत करतात असं अजित पवार म्हणाले. तसंच नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवरूनही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांचं नाव घेऊन अजित पवार यांना वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यावर अजित पवार यांनी न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलं की, नवाब मलिक यांच्यावरचा आरोप सिद्ध झाला नसताना त्यांना बाजूला ठेवणं योग्य नाही. अजित पवार यांनी पुढे जाऊन असंही सांगितलं की, 1990 पासून त्यांना ओळखतो. त्यांच्यावर केलेल्या आरोपातील प्रकरणांमध्ये त्यांचा सहभाग नाही हे मला माहिती आहे. नवाब मलिक यांना उमेदवारी देऊ नका असं मला सांगण्यात आलं होतं, पण त्यांची चूक नसताना त्यांच्यावर अन्याय होणं योग्य नव्हतं असं अजित पवार म्हणाले. "आता एखाद्यानं म्हटलं की, ही मुलाखत शूट करणाऱ्या कॅमेरामन अंडरर्ल्डचा एकदम राईट हँड आहे, तर असं कसं चालेल?" असं म्हणत अजित पवारांनी मलिकांची पाठराखण केली.
"योगी आदित्यनाथ सरकार चालवणार नाहीत"
बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याला पुन्हा एकदा अजित पवार यांनी स्पष्ट विरोध केला आहे. हा नारा दिला योगी आदित्यनाथ यांनी. ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री इथलं सरकार चालवणार नाही असं रोखठोक मत अजित पवार यांनी मांडलं. आपल्या देशात सगळ्या जातीधर्माचे लोक राहतात, त्यामुळे एकत्र राहावं लागे असं अजित पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा >>Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या बॅगा बाहेर जाताना नाही, घरी येताना चेक केल्या पाहिजे, शिंदे काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीत झालेल्या गोष्टींवर बोलताना अजित पवार म्हणाले की, पत्नी सुनेत्रा यांना बारामतीतून उभं करणं ही त्यांची चूक होती. बारामतीच्या जनतेने हे मान्य केलं नाही आणि मला माझी चूक मान्य आहे. आता लोकसभेत सुप्रिया ताईंना आणि विधानसभेत मला पाठिंबा देणार असल्याचा निर्धार बारामतीच्या जनतेने केला आहे. राष्ट्रवादीच्या विचारसरणीबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, शरद पवारांच्या विचारधारेवर पक्ष चालतो. त्यांचा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे असं अजित पवार म्हणाले.
ADVERTISEMENT