Rape Case: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये सामूहिक बलात्काराची (Gangrape) एक भयंकर घटना घडली आहे. 17 वर्षाच्या मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पहिल्यांदा तरूणीच्या प्रियकराने त्याच्या मित्रासह तिच्या वाढदिवसाला तुला पार्टी (birthday party) देतो असं सांगून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्या प्रकारामुळे तिला मानसिक धक्का बसला होता. त्या दुर्देवी घटनेमुळेच ती आत्महत्या करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर गेली होती. त्यावेळी तिला मदत करण्यासाठी एक फोटोग्राफर तिथे आला आणि तिला सोबत घेऊन निघून गेला. तो जेव्हा तिला घरी घेऊन गेला त्यावेळी त्याच्या घरी तिच्यावर 11 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
ADVERTISEMENT
तोंडात कापडाचा बोळा
मुलीवर अत्याचार होत असताना तिने अनेकांकडे मदत मागितली, मात्र तिच्या मदतीला कोणीच धावून आले नाही. तिच्या अत्याचार करताना नराधमांनी तिच्या तोंडात कापडाचा बोळा घातला होता. मात्र त्यानंतर तिने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि ती आपल्या घरी आली. त्यानंतर घराच्या घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली.
हे ही वाचा >> धावपट्टीवरच भरधाव दोन विमानांनी घेतला पेट अन्…, 379 प्रवाशांचे झालं काय?
13 जणांचा बलात्कार
पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, 17 वर्षाच्या मुलीवर एकाच दिवसात 13 जणांनी बलात्कार केल्याचे सांगितले. त्यानंतर या बलात्कार प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणातील 11 जणांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले.
मोलकरीणीवरच वाईट वेळ
ज्या मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे, ती मुलगी एका सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी मोलकरणीचे काम करत होती. संबंधित मुलगी ओडिशाची असून सरकारी अधिकाऱ्याच्या घरातील कुत्रा सांभाळयाचे कामही ती करत होती. अधिकारी रजेवर गेल्याने ती घरी एकटीच होती, त्यानंतर तिच्या मित्राने तिला बाहेर बोलवून घेऊन जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT