Rajsthan Doctor Honeytrap : पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवल्याप्रकरणी डीआरडीओचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर (Pradeep Kurulkar) यांनी काही आठवड्यापुर्वीच पोलिसांनी अटक केली होती.हनीट्रॅपचे शिकार झाल्याने प्रदीप कुरुलकर यांनी भारतासंबधित गुप्त माहिती पुरवल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता राजस्थानचा एक डॉक्टर हनीट्रॅपचा (Doctor Honeytrap) शिकार झाल्याची घटना घडलीय.या डॉक्टरला तब्बल दीड वर्ष ब्लॅकमेल करून 6.5 लाखांना लुटले होते. विशेष म्हणजे या हनीट्रॅपच्या जाळ्यात डॉक्टरांना ओढणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्या कार्यालयात काम करणारी नोकरानी होती. डॉक्टरांनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नोकरानी आणि तिच्या नवऱ्याला ताब्यात घेतले आहे. (doctor became victim of honeytrap maid showed fear of rape and grabbed 6-5 lakh bundi rajsthan)
ADVERTISEMENT
नोकरानीनेच हनीट्रॅपचा जाळ टाकला…
राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात राहणारे डॉक्टर अनिल गुप्ता हे हनीट्रॅपचे (Doctor Honeytrap) शिकार झाले होते. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या नोकरानीनेच त्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात ओढले होते. या नोकरानीने डॉक्टरांना ब्लॅकमेल करून तब्बल दीड वर्ष 6.5 लाख रूपये उकळून लुटले होते. दरम्यान नोकरानीच्या सततच्या पैशाची मागणीला वैतागून डॉक्टरांनी बुंदी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा : आधी प्रेम नंतर दिलं विष…, ‘कुंडली’च्या नादात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडलाच संपवलं
बलात्काराची धमकी देऊन ब्लॅकमेल
बुंदीच्या सामान्य रूग्णालयात डॉ.अनिल गुप्ता (Doctor Honeytrap) कार्यरत होते. याच कार्यालयात फौरंता गुर्जर नावाची एक महिला झाडू आणि साफसफाई करायला यायची. या महिलेने तिचे दागिने सोडवण्यासाठी अनिल गुप्ता यांच्याकडे सुरुवातीला 30 हजार रूपयांची मागणी केली होती. डॉक्टरांनी माणूसकीच्या नात्याने तिला ते पैसै दिले होते. मात्र काही दिवसांनी डॉक्टरांनी तिच्याकडून पैसे परत करण्याची मागणी केली होती. यावर महिलेने डॉक्टरांना बलात्काराची धमकी देण्याचा गंभीर आरोप केला. या धमकीला डॉक्टर घाबरल्याचे पाहून महिलेने त्याच्याकडून पैसै उकळायला सुरूवात केली. तब्बल दीड वर्ष महिलेने डॉक्टरांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून 6.5 लाख रुपये लूटले होते. या सर्व प्रकरणात महिलेच्या पतीचा देखील सहभाग होता, अशी माहिती बुंदी कोतवालीचे पोलीस अधिकारी सहदेव मीना यांनी दिली.
सापळा रचून आरोपींना अटक
दरम्यान इतके पैसे उकळून देखील महिलेची पैशाची भूक भागतच नव्हती. त्यामुळे महिला सतत डॉक्टरांकडे पैशाची मागणी करतच होती. या सततच्या मागणीला कंटाळून डॉक्टरांनी बुंदी पोलीस ठाण्यात महिलेविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी शनिवारी सापळा रचून फौरंता गुर्जर या महिलेला आणि पती दुर्गा लाल गुर्जरला ताब्यात घेतले होते. सध्या या दोन्ही आरोपींची चौकशी सूरू आहे.या आरोपींकडून अद्याप पैशाची रिकव्हरी झाली नाही आहे. दरम्यान या आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे.
ADVERTISEMENT