Dombivali Crime News : डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील चंद्रप्रकाश लोवंशी हा व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर काही दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला होता. त्याचा मृतदेह पाहता क्षणी त्याची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना (Manpada Police) संशय आला होता. त्या दिशने पोलिसांनी तपास केला असता मृत्यूचे गुढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे,चंद्रप्रकाश लोवंशी यांची हत्या त्याच्याच बायकोने (wife) प्रियकरासह (Boyfriend) मिळून केली आहे. हा संपूर्ण घटनाक्रम पाहून पोलिसांना देखील धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 20 जानेवारीला चंद्रप्रकाश लोवंशी हा बेपत्ता झाला होता. नवरा बेपत्ता झाल्याने रिता हिने 21 जानेवारीला मानपाडा पोलीस ठाणे गाठून नवरा चंद्रप्रकाश लोवंशी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चंद्रप्रकाशचा शोध घ्यायला सुरूवात केली होती. या दरम्यान 25 जानेवारीला आडीवली गावातील नेताजी नगर परिसरातील विहिरीत चंद्रप्रकाश लोवंशी यांचा मृतदेह आढळून आला होता. धक्कादायक बाब म्हणजे,
चंद्रप्रकाश लोवंशी यांचा मृतदेहाला दगड बांधण्यात आला होता. तसेच त्याच्या शरीरावर जखमेच्या खूना देखील होत्या. त्यामुळे चंद्रप्रकाश लोवंशी यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते.
हे ही वाचा : Lok Sabha 2024 election : ठाकरेंना मुंबईतील’या’ दोन जागा सोडाव्या लागणार?
त्यानुसार मानपाडा पोलिसांनी चंद्रप्रकाश लोवंशी याच्या हत्येचा तपास सूरू केला. या तपासा दरम्यान पोलिसांनी चंद्रप्रकाशच्या बायकोला चौकशीला बोलावले होते.या चौकशीत तिच्या वागण्या आणि बोलण्यावरून पोलिसांनी तिच्यावर संशय बळावला. यानंतर पोलिसांनी तिचा कसून तपास केला असता तिने आडीवली येथे राहणाऱ्या सुमित विश्वकर्मा याचे नाव घेत, त्याला संपूर्ण घटनाक्रम माहिती असल्याची माहिती दिली.
वपोनी अशोक होनमाने व त्यांच्या पथकाने सुमीतला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली. चंद्रप्रकाशला संपविण्यासाठी पत्नी रिता आणि तीचा प्रियकर सुमीत 4 महिन्यांपासून कट रचत होते. 20 जानेवारी ही तारीख निश्चित केली गेली. सुमीतने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने चंद्रप्रकाशला जबरदस्तीने कारमध्ये घातले आणि आडीवली येथील निर्जनस्थळी नेऊन धारदार शस्त्राने त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण लपवण्यासाठी त्याने चंद्रप्रकाश लोवंशी यांच्या मृतदेहाला भला मोठा दगड लावून त्याला विहीरीत फेकून दिले होते. चंद्रप्रकाशची पत्नी आणि त्याचे लहानपणापासुन प्रेमसंबध होते.या प्रेमसंबंधातून त्याने चंद्रप्रकाश लोवंशीची हत्या केल्याची माहिती दिली.
हे ही वाचा : MSC bank scam मधून अजित पवारांबरोबर रोहित पवारही सुटणार? मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट
या हत्या प्ररकणात पोलिसांनी सुमीतला सहकार्य करणा-या त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांना देखील ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आता चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत.
ADVERTISEMENT