Dombivli Crime : सात मुली अन् घरातच देह व्यापार; सेक्स रॅकेटवर पोलिसांची मोठी कारवाई

मिथिलेश गुप्ता

09 Oct 2023 (अपडेटेड: 09 Oct 2023, 02:50 PM)

महिलांच्या मजबुरीचा फायदा उठवून त्यांची देहविक्री करणाऱ्या 7 दलालांना डोंबिवलीमध्ये ठाणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील 5 मुलींची सुटका करण्यात आली आहे. हे मोठं रॅकेट उद्धवस्त करण्यात आल्याने अनेकांना याचा धक्का बसला आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

डोंबिवली : कोणाचा नवरा नाही, कुणाला उपचार तर कुणाला नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली वेश्या (Prostitution) व्यवसायात ढकलणाऱ्या पाच दलालांना अटक (Five brokers arrested) केली आहे. या प्रकरणातून 7 मुलींची (7 girls rescued) पोलिसांनी सुटका केली आहे. तसेच त्यांना राहण्यासाठी घर देण्याऱ्या घरमालका विरुद्धही गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

फ्रीडम फर्मने दिली माहिती

फ्रीडम फर्म या संस्थेच्या मदतीने ठाणे अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेल (Thane Anti Human Trafficking Cell) आणि मानपाडा पोलिसांकडून (Manpada Police) ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बांग्लादेशमधून मुलींना आणून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलालांचा म्होरक्या युनूस शेख उर्फ राणालादेखील अटक केली आहे.

हे ही वाचा >> Israel Hamas : ‘कॉल सुरू असतानाच…’; पती-मुलं पुण्यात, नर्ससोबत इस्रायलमध्ये काय झालं?

नोकरीचे आमिष

पुण्यातील फ्रीडम फर्म ही संस्था महिला व मुलीची देह व्यापारातून सुटका करत त्यांचे पुनर्वसन करते. 5 ऑक्टोबर रोजी या संस्थेच्या कार्यालयात बांग्लादेशहून एक ईमेल आला. या ईमेलमध्ये एका 19 वर्षाच्या मुलीला नोकरी लावण्याचा बहाण्याने बांग्लादेशहून भारतात आणले असून ती मुलगी सध्या कुठे आहे याची माहिती देण्यात आली होती.

सर्च ऑपरेशन

या घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या पदाधिकारी शिल्पा वानखेडे यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत पुण्याहून ठाणे गाठले. त्यानंतर ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी ताबडतोब बांगलादेशी महिलेची सुटका करून हेदुटणेला रवाना केले. त्यानंतरही मानपाडा पोलिसांनी डोंबिवलीतील हेदूटणेजवळ छापा टाकला पण ते पसार झाले. यावेळी राणा व त्याचे साथीदार पलावा सिटीमध्ये असल्याचे पोलिसांना समताच सर्च ऑपरेशन सुरु केले.

अंधाराचा फायदा

आरोपींना पोलिसांचा सुगावा लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेत अंतर्ली गावाबाहेर असलेल्या डोंगराळ भागात पळून गेले होते. त्यानंतरही पोलिसांनी सर्च ऑपरेशन चालवून लपून बसलेल्या 5 दलालांसह घरमालकाला बेड्या ठोकत 7 मुलींची सुटका केली. या पाच जणांचा म्होरक्या युनूस अखमल शेख उर्फ राणा ( वय 40) आहे. त्याच्यासोबतच साहिल मिजापूर शेख ( वय 26 ), फिरदोस नूर हुसेन सरदार (वय 24 ), आयुबअली अजगरअली शेख ( वय 35 ), बिपलॉप हापीजूर खान (वय 24 ) अशी युनूसच्या अटक साथीदारांची नावे आहेत. शिल्पा वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

जबरदस्तीने देहव्यापारा

या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली. तपासा दरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. या सातही महिलांना बांग्लादेश मधून नोकरी देण्याचे आमिष दाखवून तर कुणाला उपचाराचे आमिष दाखवून भारतात आणण्यात आलं होतं. या मुलींसोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला त्यानंतर या मुलींना जबरदस्तीने देहव्यापारात ढकलण्यात आलं.

हे ही वाचा >> भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘मविआ’ची मुसंडी, नांदेड कृषी समितीत शेकापने उधळलला गुलाल

नकार देणाऱ्या महिलांना मारहाण

देह व्यापारास नकार देणाऱ्या मुलींना मारहाणदेखील केली जात होती. त्यांच्या बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्र बनवून त्यांना देहव्यापारात ढकलण्यात आलं होतं. या महिलांना इतर पुरुषांसोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवण्यास सांगून राणा आणि साथीदारांकडून पैसे घेतल्याने सर्व महिलांनी सांगितले.

    follow whatsapp