Pune Crime : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरणातून अनेक गुन्हे घडत आहेत. मात्र लग्न झालेल्या जोडप्यांच्या वादविवादामुळेही अनेक धक्कादायक गुन्हे उघडकीस येत आहेत. त्यातच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील (Pimpari Chinchawad) एक लग्न झालेल्या व्यक्तीने दुसरं लग्न करण्याचा बेत केला होता. ही गोष्ट त्याच्या बायकोला समजली, आणि जोरदार वादंग माजला. त्यानंतर त्याच्या बायकोने (Wife) आपल्याच नवऱ्याला संपवण्याचा डाव आखला आणि नवऱ्याची हत्या (Murder) करण्यासाठी सुपारी दिली. त्यानंतर शेजारी राहणारे दोन तरुण त्यांच्या घरात शिरले आणि तिच्या नवऱ्यावर त्यांनी 20 ते 21 वेळा चाकूने सपासप (Attack) वार केले आणि पळून गेले. त्यानंतर त्याच गंभीर अवस्थेत कुटुंबीयांनी तिच्या नवऱ्याला रुग्णालयात दाखल केले.
ADVERTISEMENT
मिठाईलालला 8 मुली
मिठाईलाल बरुड आणि त्याची पत्नी रत्ना या दोघांना एकूण 8 मुली आहेत. त्यापैकी त्यांच्यातील एक मुलीचा महिन्याभरापूर्वीच मृत्यू झाला आहे. मिठाईलाल हे स्क्रॅपचा धंदा करतात. तिथेच त्याची पत्नी रत्ना आणि त्याच्या मुली राहतात. मिठाईलालला सगळ्या मुलीच होत्या, त्यामुळे आपल्याला एक मुलगा पाहिजे असं त्याला वाटत होतं. त्यामुळे त्याच्या मनात दुसरं लग्न करण्याचा विचार येत होता, आणि तोच त्याचा विचार त्याच्या अंगलट आला आणि जीवावर बेतला.
हे ही वाचा >> जावयाचा जीव सासूवर जडला, अंधारात चाळे सुरू असतानाच बायको आली अन्…
नवऱ्याची दिली 5 लाखाची सुपारी
आपल्याला मुलगा पाहिजे होता, या विचारानं तो प्रचंड अस्वस्थ राहत होता. आपल्याला सगळ्या मुलीच आहेत असं वाटायचं आणि तो आपल्या पत्नीला मारहाणही करत होता आणि मानसिक त्रासही देत होता. आपल्याला एक मुलगा असावा त्यासाठीच त्याने दुसऱ्या लग्नाचा विचार केला होता. मिठाईलाल दुसऱ्या लग्नाची तयारी करतोय त्याची माहिती तिला समजली आणि ती अस्वस्थ राहू लागली. त्यानंतरच तिने मिठाईलालची हत्या करण्याचा विचार तिच्या मनात येऊ लागला. त्यासाठी आपल्या नवऱ्याची हत्या करण्यासाठीच तिने शेजाऱ्या राहणाऱ्या दोन तरुणांना तिने पाच लाखाची सुपारी दिली आणि त्याला संपवण्याचा कट रचला.
शेजाऱ्याच्या तरुणांना दिली सुपारी
निगडी पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक नाथा केकान यांनी सांगितले की, मिठाईलालची पत्नी रत्ना 7 डिसेंबर रोजी बाहेर फिरून येतो म्हणून ती घराबाहेर गेली होती. त्यावेळी ज्या तरुणांना तिने हत्या करण्याची सुपारी दिली होती, त्यांना तिने सांगितले की, मिठाईलाल घरात झोपला आहे. त्यानंतर ते दोघं त्यांच्या घरात गेले आणि चाकू आणि धारदार शस्त्राने मिठाईलालवर सपासप असे 20 ते 21 वार केले. त्यांच्यावर वार होताच मिठाईलाल जोरजोरात ओरडू लागला. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली.
पत्नीनेच दिली माहिती
मिठाईलालवर चाकू हल्ला करताच ते गंभीर जखमी झाले होते, जेव्हा बाहेर गेलेल सदस्य सगळे घरी आले तेव्हा त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर होती. त्यामुळे त्यांना त्याच अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आला, त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी दाखल होत त्यांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी मिठाईलालची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.
मुलींच्या आयुष्याचं काय?
या घटनेचा तपास करून पोलिसांनी मिठाईलालची पत्नी रत्ना आणि अन्य दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या मिठाईलालची प्रकृती नाजूक असून आता पत्नीलाही अटक करण्यात आल्याने आता त्यांना असलेल्या 7 मुलींच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यांचे भविष्य आता अंधारात असल्याची भावना व्यक्त होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT