Badlapur School case चा FIR आला समोर, घटना वाचून तुमच्याही डोक्यात जाईल सणक

मुंबई तक

• 10:11 PM • 20 Aug 2024

Badlapur adarsh school FIR news: बदलापूरमध्ये एका चार वर्षीय मुलीवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील FIR आता समोर आला आहे. ज्यामध्ये नेमकी काय घटना घडली हे समोर आलं आहे.

'ही' FIR वाचून तुम्हीही हादरून जाल...

'ही' FIR वाचून तुम्हीही हादरून जाल...

follow google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचा FIR आला समोर

point

Fir मध्ये नेमकी घटना काय हे उघडकीस

point

बदलापूरमधील नागरिकांचा झाला उद्रेक

Badlapur school case: बदलापूर: बदलापूरमधील आदर्श विद्यामंदिर येथील 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण समोर येताच एकच उद्रेक झाला. आज (20 ऑगस्ट) सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 9 तास बदलापूरकरांनी थेट रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे वाहतूक रोखून धरली होती. (fir of badlapur school sexual assault of a four year old girl case an incident that shocked everyone came to light)

हे वाचलं का?

आरोपीला आजच्या आज फाशी द्या किंवा आमच्या ताब्यात द्या.. अशी मागणी करत बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलकांनी ठिय्या दिला होता. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: तिथे येऊन आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही आंदोलक एक इंचही मागे हटले नाही. अखेर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी लाठीहल्ला करत आंदोलकांना पांगवलं.

हे ही वाचा>> Badlapur News: '2000 रुपये आमच्याकडून घ्या, तुमची लाडकी बहीण योजना नको...' शिंदे सरकारवर बदलापूरकर संतापले!

यानंतरही अनेक आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत रेल्वे वाहतूक सुरळीत केली. 

दरम्यान, या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच लैंगिक अत्याचार प्रकरणाची पोलीस एफआयआर (FIR) ही समोर आली. ज्यामध्ये नेमकं काय म्हटलंय हे त्यात नमूद केलं आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Breaking News : आजच्या घटनेनंतर बदलापूरमध्ये इंटरनेट ठप्प, नेमकं काय घडतंय?

'ही' FIR वाचून तुम्हीही हादरून जाल... 

First Information contents (प्रथम खबर हकीकत ) :

मी सौ. *** *** ***** वय 35 वर्षे, धंदा, नोकरी रा. **** **** ***** ***** *** समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहून जबाब लिहून देते की, मो.नं. ********** आधारकार्ड नं. ********** ईमेल आयडी *************** 
मी वरील पत्त्यावर सुमारे 04 वर्षापासून माझे पती **** *** ***** व मुलगी **** वय 3 वर्षे 10 महिने यांचे सोबत राहात असून मी *** येथे **** **** **** कामाला असून माझे पती **** येथे **** चे काम करतात. आमचे दोघांच्या मिळणाऱ्या उत्पन्नावर आमचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

आम्ही दोघेही नोकरी करीत असल्याने मी माझ्या मुलीला ***** **** ****** **** ***** बदलापूर येथे माझे वडील **** आणि आई ***** *** *** भाऊ ****** **** **** व बहीण **** **** *** यांचेकडे जून 2023 पासून ठेवले असुन आम्ही सुट्टीच्या दिवशी मुलीला भेटण्यासाठी येत असतो. सन जून 2024 मध्ये मी मुलगी *** हिस आदर्श विद्यामंदिर, बाल विभाग, बदलापूर पूर्व येथे छोटया शिशुमध्ये अॅडमिशन घेतले व जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ती नियमीत शाळेत जात होती.

दिनांक 15/08/2024 रोजी रात्री 08.30 वा. चे सुमारास माझे वडील ***** *** यांचा मला फोन आला व तू उद्या सकाळी बदलापूर येथे निघून ये.. असे सांगितले. त्यांना मी कारण विचारले असता त्यांनी मला काहीएक न सांगता येताना तुझ्या पतींना घेऊन ये. असे बोलून फोन ठेवून दिला.

त्यानुसार मी व माझे पती आज दिनांक 16/08/2024 रोजी 11.30 वा. चे सुमारास बदलापूर येथे माझे वडिलांचे घरी आलो असता मला माझ्या वडिलांनी सांगितले की, दिनांक 13/08/2024 रोजी तू मला **** हीस शाळेतून घरी घेऊन येण्यास सांगितले त्यानुसार मी **** हिस शाळेतून घरी घेऊन येत असताना मला तिच्या वर्गातील *** **** हिचे वडील *** **** हे शाळेत भेटले व त्यांनी मला सांगितले की, माझी मुलगी *** हिने आम्हाला असे सांगितले आहे की ती शाळेत असताना एक दादा नावाच्या इसमाने तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला आहे. 

त्यानुसार **** **** शाळेत तिच्या शिक्षकांना भेटले असून ते त्यांच्या मुलीची मेडीकल करणार आहेत. त्यानुसार मला देखील संशय आल्याने मी दिनांक 15/08/2024 रोजी *** हिस बदलापूर येथील रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिस तपासून तिचे सोबत HYMEN OPEN 1 CM CMC ERYTHEMA (शारीरीक संबंध) झालेबाबत मला सांगितल्याने मी तुला बोलावून घेतले आहे.

त्यानुसार मी माझी मुलगी *** हिस विचारले असता तिने मला सांगितले की मी शाळेत असतांना एक दादा असून तो माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करतो. तो माझे कपडे काढतो व मला देत नाही. 

असे सांगितल्याने मी आज रोजी तक्रार देण्यास पोलीस ठाण्यात आलेली आहे. तरी दिनांक 13/08/2024 रोजी सकाळी 09.00 वा ते 12.00 वा. चे दरम्यान आदर्श विदयामंदिर, बदलापूर पूर्व येथे शिकत असताना अनोळखी इसम (दादा नावाचा) याने माझी मुलगी लहान असल्याचा गैरफायदा घेऊन तिचे सोबत जबरीने शारीरीक संबंध केला आहे. 

तसेच साक्षीदार यांची मुलगी देखील लहान असल्याचे माहित असून तिचे सोबत विनयभंग केल्याने माझी दादा नावाने ओळखत असलेल्या अनोळखी इसमांविरुध्द कायदेशीर तक्रार आहे.

माझी वरील फिर्याद संगणकावर मराठीत टंकलिखीत केली असून ती मी वाचून पाहिले असता माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे.

    follow whatsapp