Crime : अरे देवाSS! बाळाला जन्म दिल्यानंतर महिलेने घेतला गळफास, कारण…

मुंबई तक

19 Jun 2023 (अपडेटेड: 19 Jun 2023, 10:21 AM)

उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी युक्रेनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने (Women) प्रसुतीनंतर गळफास घेतल्याची घटना घडली आहे. ओकसाना ममचर (27) असे या महिलेचे नाव आहे.

Mumbaitak
follow google news

उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका महिलेने (Women) प्रसुतीनंतर गळफास घेतल्याची घटना घडली आहे. ओकसाना ममचर (27) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला मुळची युक्रेनची रहिवासी होती, मात्र लग्नानंतर ती लखनऊनमध्ये (lucknow) राहत होती. या दरम्यान लखनऊमध्ये तिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या आत्महत्येच्या घटनेने परीसरात एकच खळबळ माजली आहे. (foreigner woman commit suicide three days after giving birth afraid of being disfugured in lucknow crime news)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊच्या (lucknow) सेक्टर 1 परीसरात राहणाऱ्या 27 वर्षीय ओकसाना ममचरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत महिला ही मुळची युक्रेनची रहिवासी होती. मात्र तीनच महिन्यांपुर्वी ओकसाना ममचर तिच्या सासरी आली होती. सासरी ती सासू रूथ आणि ननंद रूफीना व युहाना यांच्यासोबत राहत होती. तर ओकसानाचा पती युक्रेनच्या एका युनिवर्सिटीत पीएचडी करत आहेत.

हे ही वाचा : सांगली हादरली! राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची आठ गोळ्या घालून हत्या

गेल्या 14 जूनला ओकसानाने एका प्रायव्हेट रूग्णालयात बाळाला जन्म दिला होता. यावेळी ओकसानाची नॉर्मल डिलीव्हरी झाली होती. या डिलिव्हरीनंतर ओकसानाने तिच्या युक्रेनमध्ये राहत असलेल्या नवऱ्याशी व्हॉट्सअॅप चॅटवर बातचीत केली होती. या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये, ओकसानाने प्रसुतीनंतर शरीर विद्रूप झाल्याची चिंता व्यक्त केली होती. माझे शरीर विद्रुप झाले आहे, ज्यामुळे मला नोकरी मिळणार नाही, अशी भीती तिला सतावत होती. या भीतीतून महिलेने सुसाईड नोट लिहली होती. ही सुसाईड नोट लिहल्यानंतर महिलेने आत्महत्या केली होती. या दरम्यान दुसऱ्या खोलीत तिचं नवजात बाळ झोपलं होतं.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली होती. या घटनेनंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती. या माहितीनंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. या घटनेची माहिती पोलिसांनी युक्रेनमध्ये राहत असलेल्या महिलेच्या पतीला दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेच्या आत्महत्येचा तपास सुरु केला आहे. आता या घटनेत आत्महत्येचे ठोस कारण काय समोर येते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

    follow whatsapp