मुंबईत ऑनर किलिंग : आधी जावयाची सपासप वार करत हत्या, नंतर मुलीला ठेचून मारलं!

रोहिणी ठोंबरे

18 Oct 2023 (अपडेटेड: 18 Oct 2023, 02:57 AM)

मुंबईत ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. गोवंडी परिसरात वडील, भाऊ आणि तीन अल्पवयीन मुलांनी मिळून मुलीची आणि तिच्या पतीची हत्या केली. मुलीने दुसऱ्या धर्मातील मुलासोबत प्रेमविवाह केला होता, त्यामुळे घरातील लोक संतापले आणि रागाच्या भरात त्यांनी दोघांची हत्या केली.

Honor killing in Mumbai Govandi couple killed by Girls Father Brother and Minors

Honor killing in Mumbai Govandi couple killed by Girls Father Brother and Minors

follow google news

Mumbai Honor Killing : मुंबईत ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. गोवंडी परिसरात वडील, भाऊ आणि तीन अल्पवयीन मुलांनी मिळून मुलीची आणि तिच्या पतीची हत्या केली. मुलीने दुसऱ्या धर्मातील मुलासोबत प्रेमविवाह केला होता, त्यामुळे घरातील लोक संतापले आणि रागाच्या भरात त्यांनी दोघांची हत्या केली. (Honor killing in Mumbai Govandi couple killed by Girls Father Brother and Minors)

हे वाचलं का?

14 ऑक्टोबर रोजी मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशन परिसरात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. येथील देवनार गावातील टेलिकॉम फॅक्टरी परिसरात असलेल्या एका विहरीत काही मुलं पोहण्यासाठी गेली असता त्यांना मृतदेह आढळला. तो 20 ते 22 वर्षांचा होता आणि त्याची हत्या करण्यात आली होती.

किडनी निकामी, त्यातच डोक्यावर कर्ज, पती-पत्नी मुलाची सामूहिक आत्महत्या

त्याच्यावर अनेक वार करण्यात आले होते. मुंबई पोलिसांचे झोन VI चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 10 टीम तयार केल्या आहेत.

हत्या करण्यात आलेला तरूण मूळचा कुठला रहिवासी होता?

करण रमेश चंद्र (22) असे मृताचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचे पोलीस पथकांना आढळून आले. याप्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात भादंवि कलम 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वर्षभरापूर्वी करणने गुलनाज खान (20) या तरूणीसोबत प्रेमविवाह केला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांना मृत करणच्या पत्नीच्या वडिलांवर संशय आला, त्यानंतर तिचे वडील गोरा रईसुद्दीन खान (50) याची चौकशी करण्यात आली.

‘विरोधात मतदान करा..’, रिलायन्समध्येच Anant Ambani ला विरोध; काय आहे प्रकरण?

मुलीच्या वडिलांनी गुन्ह्याची दिली कबुली!

अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत, रईसुद्दीन खानने कबुली दिली की त्याने त्याचा मुलगा सलमान गोरा खान (22) आणि इतर साथीदारांच्या मदतीने ही हत्या केली. आरोपीने सांगितले की त्याने आपली मुलगी गुलनाज आणि तिचा पती करणची हत्या केली कारण दोघांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते आणि एकत्र राहू लागले होते. गुलनाजचा मृतदेह नवी मुंबईतील कळंबोलीत एका अज्ञातस्थळी फेकला, ती जागा आरोपींनी दाखवली.

Viral News: नवं घर पाहायला गेला, उंबरठ्यात पाय ठेवताच काळाने घातला घाव; एका क्षणात…

सासऱ्याने जावयाला आणि मुलीला धारावी येथीस घरी बोलावले. त्यानंतर खरेदीच्या बहाण्याने त्यांनी जावयाला देवनार परिसरात आणले. याठिकाणी दोघांवर चाकूने सपालप वार केले. जावयाला आरोपींनी विहरीत फेकलं तर, मुलीला चेहरा दगडाने ठेचून तिचा मृतदेह अज्ञातस्थळी फेकण्यात आला.

पोलिसांनी वडील आणि भावासह इतर आरोपींना केली अटक

या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गोरा रईसुद्दीन खान (50), त्याचा मुलगा सलमान गोरा खान (22), सलमानचा मित्र मोहम्मद कैफ, नौशाद खान आणि त्याच परिसरातील अन्य 3 अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. याशिवाय हत्येतील इतर आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

    follow whatsapp