Crime : हाताची बोट छाटली, मुंडकं धडावेगळे…अनैतिक संबंधातून भयंकर हत्याकांड

प्रशांत गोमाणे

• 09:17 AM • 30 Sep 2023

मध्यप्रदेशच्या मटोंध पोलिस ठाणे हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. 27 सप्टेंबरला चमरहा मोडजवळ पोलिसांना डोकं धडावेगळ असलेल्या अवस्थेत एका महिलेचा अर्धनग्न मृतदेह सापडला होता. या घटनेची माहिती मिळताच एसपी अंकुर अग्रवाल पोलीस दलासह घटनास्थळी धाव घेतली होती.

Pune Indapur Hagarewadi Crime News bodies of mother and daughter were found hanged

Pune Indapur Hagarewadi Crime News bodies of mother and daughter were found hanged

follow google news

देशभरात अनैंतिक संबंधातून किंवा संशयातून हत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेत एका महिलेचा मृतदेह निर्जनस्थळी सापडला होता. या मृतदेहाची अतिशय बिकट अवस्था होती. मृतदेहाच्या डोक्यावरील केस कापण्यात आली होती, तिच्या हाताची बोटे छाटली होती. इतकंच नाही तर तिचे डोकं देखील धडावेगळं करण्यात आले होते. इतक्या निर्घृणपणे तिची हत्या करून मृतदेह झुडूपांत  फेकण्यात आला होता. पोलिसांच्या हाती हा मृतदेह लागताच 24 तासांत त्यांनी हत्येचा उलगडा केला आहे. नेमकी ही घटना काय आहे? हे जाणून घेऊयात. (husband along with his son killed women shocking crime story from banda uttar pradesh)

हे वाचलं का?

घटनाक्रन काय?

मध्यप्रदेशच्या मटोंध पोलिस ठाणे हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. 27 सप्टेंबरला चमरहा मोडजवळ पोलिसांना डोकं धडावेगळ असलेल्या अवस्थेत एका महिलेचा अर्धनग्न मृतदेह सापडला होता. या घटनेची माहिती मिळताच एसपी अंकुर अग्रवाल पोलीस दलासह घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलीस तपासात एक धक्कादायक घटना समोर आली. मृत महिलेचे वय हे 35 ते 40 वर्ष होते. या महिलेच्या एका हाताची चार बोटे छाटण्यात आली होती. तसेच डोकं धडापासून वेगळं करण्यात आले होते. तसेच मृतदेहाच्या डोक्यावरची केस कापण्यात आली होती,तिच्या दातांनाही तोडण्यात आले होते आणि मृदेह झुडपात फेकून देण्यात आला होता.

हे ही वाचा : Gautami Patil: गौतमीच्या कार्यक्रमात तुफान राडा, खुर्च्याची तोडफोड; नेमकं काय घडलं?

पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटवणे हे सर्वांत मोठं आव्हान होते. पोलिसांनी हे आव्हान स्विकारत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. तसेच पोलिसांनी या हत्येच्या तपासासाठी 5 टीमही गठीत केल्या होत्या. या टीमच्या माध्यमातून वैज्ञानिक तंत्रज्ञान, जीपीएस टेक्नॉलॉजी, बेपत्ता व्यक्तींच्या माहितीच्या आधारे मृत महिलेचा तपास सूरू करण्यात आला होता. या तपासात पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची चौकशी केली असता घटनेचा उलगडा झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मृत महिलेचे नाव माया देवी असून ती गोरीहारच्या छतरपुरची रहिवासी आहे. माया देवीचे 2 लग्न झाले होते. यामध्ये माया देवी तिचा दुसरा पती रामकुमार सोबत राहायची. तिच्यासोबत तिच्या पहिला पतीचे दोन मुले, सूरज प्रकाश (22) आणि छोटू उर्फ ब्रजेश (19 )राहत होते. मृत महिलेचे दोन्ही सावत्र मुले तिच्यावर वाईट नजर ठेवायचे. त्यामुळे नवऱ्याला तिच्यावर अनैतिक संबंधाचा संशय होता. या संशयातून आरोपीने माया देवीच्या हत्येचा कट रचला होता.

अनैतिक संबंधाच्या संशयातून आरोपी पतीने आपल्या मुलांसह माया देवीवर कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. त्यानंतर तिची ओळख लपवण्यासाठी डोकं धडावेगळं केले, डोक्यावरची केस काढली, हाताची बोट छाटली आणि मृतदेह झूडपात फेकून दिली होता. पोलिसांच्या 5 टीमने या घटनेचा कसून तपास करून 24 तासात पतीसह 4 जणांना अटक केली.

हे ही वाचा : Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले ‘OBC ना…’

या प्रकरणी पोलीस अधिक्षक अंकुर अग्रवाल म्हणाले की, मध्यप्रदेशच्या मटोंध पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी 5 टीमची नियुक्ती करण्यात आली होती. या टीमने 24 तासांत 4 आरोपींना अटक केली. या आरोपींना तूरूंगात टाकले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे.

    follow whatsapp