IAS पूजा खेडकरांचे आई-वडील गायब; पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट!

रोहिणी ठोंबरे

15 Jul 2024 (अपडेटेड: 15 Jul 2024, 05:21 PM)

IAS Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारनाम्याची मालिका संपता संपत नाही आहे. आता आणखी एक मोठी अपडेट या प्रकरणात समोर आली आहे. IAS पूजा खेडकरांचे आई-वडील गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

IAS पूजा खेडकरांचे आई-वडील गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

point

पुणे ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने खेडकर कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे.

point

IAS पूजा खेडकर यांचे वादग्रस्त प्रकरण काय?

IAS Pooja Khedkar Case New Update : प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर यांच्या कारनाम्याची मालिका संपता संपत नाही आहे. दररोज नवनवीन खुलासे या प्रकरणात होत आहेत. आता आणखी एक मोठी अपडेट या प्रकरणात समोर आली आहे. IAS पूजा खेडकरांचे आई-वडील गायब असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (IAS Pooja Khedkar parents manorama and dilip khedkar are  missing Police gave an important update

हे वाचलं का?

पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांचा जुना व्हिडीओ व्हायरला झाला होता. यामध्ये त्या बंदुक दाखवत एका शेतकऱ्याला धमकावताना दिसल्या. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. पण, त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. पूजा खेडकर प्रकरणात नवनवीन खुलासे होत असताना तिच्या आईचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे. 

हेही वाचा : Chhagan Bhujbal : आधी सडकून टीका, अचानक शरद पवारांची घेतली भेट

पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या नवीन माहितीनुसार, आता पूजा यांचे आई-वडील गायब आहेत. त्यांचे फोन बंद असून, अद्याप संपर्क होत नाही आहे. 'आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांसह अनेक पथके पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी सापडल्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल', असंही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख म्हणाले.

पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके तयार केली आहेत. त्यांच्या मदतीने खेडकर कुटुंबीयांचा शोध घेतला जात आहे. त्यांचे फोन स्वीच ऑफ असल्याने त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही आहे.  

हेही वाचा : Vidhan Parishad Election : "क्रॉस व्होटिंगमध्ये माझे नाव आल्याचे पाहिले अन्...", आमदार चौधरींनी सोडलं मौन

IAS पूजा खेडकर यांचे वादग्रस्त प्रकरण काय?

2023 बॅचच्या पूजा खेडकरांवर पुण्यात प्रोबेशन IAS अधिकारी म्हणून काम करताना पदाचा गैरवार केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकर यांनी अनेक सुविधांची मागणी केली होती. खरं तर या सुविधा प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना मिळत नाहीत. तरीही पूजा खेडकर यांनी  लाल-निळे दिवे आणि व्हीआयपी नंबर प्लेट असलेली तिची वैयक्तिक ऑडी कार वापरली होती, त्यांनी आपल्या वाहनावर 'महाराष्ट्र सरकार' असा फलक लावला आणि अधिकृत गाडी, निवास, कार्यालय कक्ष आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. इतकचं नाही तर त्यांनी त्यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरवरही ताबा मिळवला. होता. 

या सर्व प्रकरणानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून पूजा खेडकरची तक्रार केली. त्यानंतर पूजाची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली.  

हेही वाचा : IITM पुणे येथे 30 जागांसाठी भरती; 'फी' न भरता अर्ज करा अन् भरमसाठ पगाराची नोकरी मिळवा!  

याशिवाय, पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पेअर्ड आणि मेंटल इलनेस असल्याची सर्टिफिकेट सादर करून UPSC ची परीक्षा दिली होती. त्याआधारे विशेष सवलत मिळवून त्या आयएएस झाल्या. त्यांना जर ही सवलत मिळाली नसती तर जितके गुण त्यांना मिळाले आहेत त्यात त्यांना IAS पद मिळणे अशक्य होते. 

त्याचबरोबर निवड झाल्यानंतर, पूजा खेडकर यांची वैद्यकीय तपासणी होणार होती, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांनी सहा वेळा वैद्यकीय चाचण्या करण्यास नकार दिला. तसेच, बाहेरच्या वैद्यकीय एजन्सीकडून एमआरआय अहवाल सादर करणे निवडले, जे UPSC ने स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, नंतर यूपीएससीने हा अहवाल स्वीकारला. यामुळे सरकारने याबाबत चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे.
 

    follow whatsapp