Pakistan Crime News: इस्लामाबाद: पाकिस्तानमध्ये (Pakistan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही पालक त्यांच्या मृत मुलींच्या कबरीला कुलूप लावून वासनांध बलात्काऱ्यांपासून वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. डेली टाइम्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये नेक्रोफिलिया (Necrophilia) म्हणजेच महिला मृतदेहांवर बलात्कार (Rape) करण्याचं प्रमाण वाढत आहे. (in pakistan rape is happening with the dead body parents are locking the graves of girls)
ADVERTISEMENT
पाकिस्तानातील काही वासनांध पुरुष हे आपली वासना शमविण्यासाठी चक्क महिलांचे पुरलेले मृतदेह उकरून त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत असल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. ज्यामुळे आता पाकिस्तानातील ज्या पालकांच्या मुली मृत पावल्या आहेत त्यांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळेच आता अशा वासनांधांपासून आपल्या मृत मुलींचं संरक्षण व्हावं यासाठी कबरींवर लोखंडी जाळीचा दरवाजा बसून त्याला कुलूप लावण्यात येत आहे. जेणेकरून त्यांच्या मृत मुलींवर बलात्कार होणार नाहीत.
नेमकं प्रकरण काय?
न्यूज एजन्सी एएनआयने डेली टाइम्सच्या वृत्ताचा हवाला देत म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये दर दोन तासांनी एका महिलेवर बलात्कार होतो, परंतु मृत मुलींच्या बलात्काराच्या घटना या खूपच लज्जास्पद आहेत. ‘द कर्स ऑफ गॉड, व्हाय आय लेफ्ट इस्लाम’या पुस्तकाचे लेखक हारिस सुलतान यांनी याला कट्टरतावादी विचारसरणीच जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
हे ही वाचा>> मारेकरी अतीक आणि अशरफच्या डोक्यात गोळ्या झाडताना ‘तो’ चौथा व्यक्तीही होता हजर?
हारिस म्हणाले की, ‘पाकिस्तानातील कट्टरपंथी लोकांनी असा समाज निर्माण केला आहे की, जिथे आई-वडिलांना आपल्या मुलीच्या मृतदेहाच्या सुरक्षेसाठी कबरीलाही कुलूप लावावे लागत आहे.’
लोक नेक्रोफिलियासाठी कट्टरतावाद्यांना दोष देत आहेत. 2011 मध्ये, कराचीच्या उत्तर निजामाबाद येथे असलेल्या दफनभूमीचा केअरटेकर मोहम्मद रिझवान याला अटक करण्यात आली होती. मोहम्मद रिजवानने सांगितले की, त्याने आतापर्यंत 48 महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार केला आहे.
हे ही वाचा>> अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडणारा शुटर अरुण उर्फ कालिया कोण आहे?
मानवी हक्क आयोगाने अहवाल दिला आहे की, पाकिस्तानमधील 40 टक्क्यांहून अधिक महिलांना कधी ना कधी हिंसाचाराचा सामना करावा लागतो. मात्र, सरकारने याबाबत अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही.
यामुळे मानवाला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत लोक अधिक जागरूक होत आहेत. त्यांनी महिलांच्या कबरीवर लोखंडी गेट आणि त्यावर कुलूप बसवलं आहे. हे एक सकारात्मक पाऊल आहे, पण याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
ADVERTISEMENT