Wife Murder: पत्नी तिच्या माहेरच्या घरी होती, एक दिवस नवऱ्याने (Husband) तिला सतत फोन केला. मात्र त्या फोनला पत्नीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने दिवसभरात पत्नीला (Wife) शंभरहून अधिक वेळा फोन केला, तरीही त्याचा काही फोन तिने उचलला नाही. त्यामुळे तो प्रचंड रागावला होता. म्हणून त्याने प्लॅन केला, आणि तो तिच्या माहेरी म्हणजे त्याच्या सासरच्या घराकडे निघाला. सुमारे 5 तासांच्या प्रवासानंतर तो पत्नीच्या घरी पोहोचला, आणि मुलाला पाहण्याचे नाटक करत असतानाच त्याने पत्नीची हत्या केली. मात्र त्यानंतर त्याने जे काय केले त्या प्रकारामुळे तर अनेकांना धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
उतावीळ नवरा
ही घटना आहे कर्नाटकातील. 32 वर्षीय हवालदार किशोर डी हे चामराजनगरच्या रामसमुद्र येथील चामराजनगरच्या पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांचे लग्न झाले होते, त्यातच त्याची पत्नी गरोदर होती, त्यामुळे ती आपल्या माहेरी होसाकोटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलाथूरमध्ये होती. आणि नुकताच तिने 11 दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्मही दिला होता. त्या मुलीला पाहण्यासाठीच किशोर किती तरी उतावीळ झाला होता. त्यामुळे त्याने पोलीस ठाण्यातून सुट्टी घेऊन चामराजनगरपासून 232 किलोमीटर अंतरावर असलेल्या होसाकोटेला गेला होता.
जावयाचा केला होता आदरातिथ्य
मुलीला पाहण्यासाठी पोलीस हवालदार किशोर डी हे सासरच्या घरी जात होते, मात्र त्यांच्या मनात विचित्र काही तरी चालले होते. आणि ते कोणालाच समजले नाही. काही तासांचा प्रवास करून तो जेव्हा पत्नीच्या घरी पोहोचला तेव्हा सासरच्या मंडळीनीही त्याचा आदरातिथ्य व्यवस्थित केले. त्यानंतर सोमवारी सासरचे लोक काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. त्यावेळी किशोर तिथेच होता. आता घरात फक्त किशोर, त्याची पत्नी प्रतिभा आणि नवजात मुलगीही होती.
हे ही वाचा >>‘लग्नानंतर पुरुष रोज रात्री…’, नितीश कुमारांच्या वक्तव्यावरुन गोंधळ अन् संताप
आत्महत्येचं नाटक
त्यानंतर अचानक किशोर प्रतिभाच्या खोलीत गेला. त्यावेळी त्याने प्रतिभाला काही समजण्याआधीच त्याने प्रतिभाचा गळा आवळला आणि तिची त्याने हत्या केली. त्यानंतर किशोरने शांत डोक्याने पुन्हा एक प्लॅन रचला. त्याने घरातील एक साडी घेतली आणि पंख्याला अडकवून त्याने तिने गळफास घेतल्याचे दाखवत तिला पंख्याला लटकवत ठेवले. त्यातून त्याला प्रतिभाने आत्महत्या केल्याचेच दाखवायचे होते. मात्र तेवढ्यात सासरची मंडळी घरी आले आणि तो घाबरला, आणि त्याने तिथून पळ काढला.त्यावेळी सासरच्या लोकांना आपल्या मुलीची हत्या झाल्याचे समजले आणि त्यांनी होसाकोट पोलिसात त्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी प्रतिभाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यावेळी पोलीस किशोरचा शोध घेत होते.
हत्या करुन फरार
प्रतिभाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर पत्नीची हत्या करणारा तिचा नवरा हा पोलीस खात्यात असल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. प्रतिभाची हत्या करुन किशोर आपल्या गावी पळ काढला होता. त्याच्या गावी कोलार येथे जाऊन त्याने कीटकनाशक पिऊन त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला त्या अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. मात्र, त्याचीही प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बायकोवर संशय आणि मारहाण
पोलिसांनी या प्रकरणाच तपास केल्यानंतर त्यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून किशोर त्याच्या पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरुन तिच्याबरोबर वाद घालत होता. तिला तो मारहाणही करत होता. त्यानंतर प्रतिभाच्या घराच्यानीही तिला समजूत घालून तिला त्याच्याजवळ राहायला सांगितले होते.
मोबाईल हिस्ट्री पाहत बसणं
किशोरची पत्नी प्रतिभा ही बेत्ताहलसूर ग्रामपंचायतीचे सचिव सुब्रमणि यांची धाकटी मुलगी होती. तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.ई. केले होते. त्यानंतर 13 नोव्हेंबर 2022 रोजी तिचे किशोरसोबत लग्न झाले होते. पोलिसांनी सांगितले की, किशोरला प्रतिभाच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे तो सतत तिचा मोबाईल तपासणी, मेसेज बघणे, तिला मेसेज पाठवणाऱ्यांची हिस्ट्री चेक करणे असे प्रकार तो करत होता.
बाळावर विपरित परिणाम
गेल्या रविवारी किशोरने आपल्या पत्नीला फोन करून शिवीगाळ केली होती. त्यानंतर प्रतिभाच्या आईने तिच्याकडील फोन काढून घेतला आणि कट केला होता. त्यावेळी प्रतिभाच्या आईने तिला समजून सांगितले होते की, तू रडत राहिलीस तर बाळाच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होईल. त्यामुळे किशोरचा तू फोन उचलू नकोस अशी ताकीदच तिच्या आईने दिली होती.
दीडशे वेळा फोन
आईने तिला हे समजून सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिभाला किशोरने दीडशे वेळा फोन केला होता. तर सोमवारी प्रतिभा तिचे आई वडिल आणि तिची नवजात मुलगी असे चौघे जण घरी होते. मात्र काही तरी कामानिमित्त तिचे आई वडिल बाहेर गेले आणि किशोरने रागाच्या भरात प्रतिभाचा गळा आवळला आणि तिची हत्या केली आणि तो फरार झाला. किशोर आपल्या गावी गेला आणि त्याने तिथे जाऊन कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सध्या त्याची परिस्थिती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.
प्रतिभाची हत्या झाल्यानंतर आता प्रतिभाच्या कुटुंबीयांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. किशोर हा प्रतिभाच हुंड्यासाठीही छळ करत होता, अशी तक्रार आता तिच्या आई वडिलांनी केला आहे.
ADVERTISEMENT
