-दिपेश त्रिपाठी, मुंबई
ADVERTISEMENT
Lalit Patil Latest News : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आलं. गेल्या 15 दिवसांपासून लपून बसलेल्या ललित पाटीलचा पोलिसांकडून देशभरात शोध सुरू होता. पोलीस मागावर असतानाच ललित पाटीलने एक कॉल केला आणि गेम झाला. मुंबई पोलिसांनी चेन्नईतून त्याला अटक केली.
ड्रग्ज माफिया ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित झाल्या. ललित पाटील फरार झाल्यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलिसांची विशेष १० पथकं तयार करण्यात आली होती. मागील १५ दिवसांपासून पोलीस ललित पाटीलच्या मागावर होती.
हेही वाचा >> मुंबईत ऑनर किलिंग : आधी जावयाची सपासप वार करत हत्या, नंतर मुलीला ठेचून मारलं!
पोलिसांकडून धरपकड
ललित पाटील ससून रुग्णालयातून फरार झाल्याने मोठी खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या साथीदारांची धरपकड सुरू केली होती. काही साथीदारांना पोलिसांनी अटक केली. दुसरीकडे ललित पाटीलचा पोलीस शोध घेत होते. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांकडून सापळे टाकले जात होते, पण अपयशी झाले.
एक कॉल अन् ललित पाटील अडकला जाळ्यात
मिळालेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयातून फरार झाल्यानंतर ललित पाटीलने एका ट्रॅव्हल कंपनीची कार घेतली. दोन सहकाऱ्यांसह तो आधी गुजरातला गेला. त्यानंतर धुळ्याला आला. पुढे कर्नाटकात गेला. नंतर ललित पाटील बंगळुरुला पोहोचला.
हेही वाचा >> Relationship: लग्न झालेल्या महिलांकडे पुरुष का होतात सर्वाधिक आकर्षित?, कारण…
वेगवेगळ्या राज्यात फिरत असताना ललित पाटील त्यांच्या एका सहकाऱ्याच्या संपर्कात होता. या सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या आरोपीला ललित पाटीलने कॉल केला. त्यामुळे पोलिसांना त्याचा ठिकाणा कळाला. त्यानंतर मुंबईतील साकीनाका पोलीस चेन्नईत पोहोचले. सापळा रचून पोलिसांनी ललित पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. त्याला मुंबईत आणले जाणार आहे.
ललित पाटलाच्या भाऊही अटकेत
पुण्यातून ललित पाटील फरार झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. पुणे पोलीस ललित पाटीलच्या गावात पोहोचले. त्याचा भाऊ भूषण पाटीलला पुणे पोलिसांनी अटक केलेली असून, त्याला नाशिकलाही नेण्यात आले होते.
ADVERTISEMENT