Crime: माय-लेकाला हाडं मोडेपर्यंत बॅटीनं मारलं, दाम्पत्याने जीवघेणा हल्ला का केला?

Latur Crime : गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरासह (Latur City) जिल्ह्यातील काही भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मारामारी, चोरी आणि दरोड्याचे प्रकार चालू असतानाच आता लातूर शहरात मारहाणीच्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण एका ज्येष्ठ महिलेला आणि तिच्या मुलाला क्षुल्लक कारणावरुन मारहाण (beating) करण्यात आल्याने या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. महिलेला बॅटने […]

latur city mother and child were beaten with a bat, mother seriously injured

latur city mother and child were beaten with a bat, mother seriously injured

मुंबई तक

• 03:12 PM • 13 Nov 2023

follow google news

Latur Crime : गेल्या काही दिवसांपासून लातूर शहरासह (Latur City) जिल्ह्यातील काही भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. मारामारी, चोरी आणि दरोड्याचे प्रकार चालू असतानाच आता लातूर शहरात मारहाणीच्या एका घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कारण एका ज्येष्ठ महिलेला आणि तिच्या मुलाला क्षुल्लक कारणावरुन मारहाण (beating) करण्यात आल्याने या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे.

हे वाचलं का?

महिलेला बॅटने झाली मारहाण

लातूर शहरात एका जोडप्याने 53 वर्षीय महिला आणि तिच्या मुलाला क्रिकेटच्या बॅटने प्रचंड मारहाण करण्यात आली आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दिलेल्या तक्रारीनुसारश्रीनिवास नगर परिसरात सकाळी मारहाणीचा प्रकार घडला आहे. या घटनेप्रकरणी गोपाल आणि सपना दरक या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ महिलेला का मारहाण करण्यात आली आहे, त्याचा तपास आता पोलीस करत आहेत.

हे ही वाचा >> दिवाळी दिवशीच प्रायव्हेट पार्टजवळ फटाके फोडले, अन् ‘त्याचा’ जीवच…

मायलेकरांचा गुन्हा काय?

पोलिसांनी सांगितले की, मंतीनगर येथील रहिवासी संगीता राजकुमार भोसले या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या होत्या. यावेळी त्यांना दरक दांपत्याने अडवून त्यांना क्रिकेटच्या बॅटने जोरदार मारहाण केली. या घटनेची माहिती देताना पोलीस म्हणाले की, काही अंतरावर पायी जात असताना महिलेवर हल्ला केला. त्यावेळी मध्यस्थी करायला आलेल्या मुलावर त्यांनी बॅटने हल्ला केला. त्यामुळे या मारहाणीत दोघंही जखमी झाले आहेत.

बॅटने अर्धा तास मारहाण

दरक दांपत्याने मायलेकरांना किमान अर्धा तास मारहाण केली आहे. त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. बॅटने मारहाण करण्यात आल्याने दोघंही जखमी झाली आहेत. या प्रकरणी अजूनपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.

    follow whatsapp