दिल्लीच्या (Delhi) द्वारका परिसरात एका पायलट महिलेला (pilot Women) जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महिलेला तिच्याच घरातून केस ओढून बाहेर काढण्यात आले आणि त्यानंतर रस्त्यावर खेचत जमावाने बेदम मारहाण केली. या दरम्यान बायकोला वाचवायला मध्ये आलेल्या तिच्या नवऱ्याला देखील जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. आता तु्म्हाला प्रश्न पडला असेल या दाम्पत्याला जमावाने मारहाण का केली? तर या संपूर्ण प्रकरणामागे एक 10 वर्षीय मुलगी आहे. नेमकं या मुलीसोबत दाम्पत्याने काय केले आहे? व दाम्पत्याला जमावाने मारहाण का केली? हे जाणून घेऊय़ात. (made minor girl beat and tortured pilot couple in delhi Video viral)
ADVERTISEMENT
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कौशिक बागजी (36) हे एका खाजगी एयरलाईन्समध्ये ग्राऊंड स्टाफ म्हणून कार्यरत होते. तर त्यांची पत्नी पूर्णिमा बागची (33) दुसऱ्या एका एय़रलाईन्समध्ये पायलट होती. दोघांनी त्यांच्या घरी एका 10 वर्षीय मुलीला घरकामासाठी ठेवले होते. या चिमुकलीला हे दाम्पत्य मारहाण आणि टॉर्चर करायचे.चिमुकलीच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आणि चेहऱ्यावर सुज देखील आढळली होती. या घटनेची माहिती मिळताच जमावाने मिळून पायलट दाम्पत्याला मारहाण केली.
हे ही वाचा : Manipur: जमावाकडून महिलांची नग्न धिंड, गँगरेप आणि खून… मणिपूरमध्ये काय घडलं?
10 वर्षीय मुलीला दाम्पत्य मारहाण करत असल्याची घटना तिच्या नातेवाईकाने पाहिली होती. त्यामुळे नातेवाईकाने त्यांच्या ओळखीच्या नागरीकांना घेऊन दाम्पत्याचे घरं गाठलं होतं. यावेळेस पायलट पूर्णिमा बागची या कामावरून घरी आल्या होत्या. यावेळी जमावाने पायलट महिलेची केस ओढत तिला घराबाहेर काढले, त्यानंतर रस्त्यावर नेत तिला बेदम मारहाण केली होती. या महिलेल्या वाचवायला आलेल्या तिच्या पतीला देखील मारहाण केली गेली. या घटनेत एका वृद्ध व्यक्तीने हस्तक्षेप केल्यानंतर ही घटना मिटली.
पोलीस उपायुक्त एम हर्ष वर्धन यांनी दिलेल्या माहितीनूसार, द्वारकाच्या दक्षिण पोलीस ठाण्यात घरकाम करणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीला टॉर्चर करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. ही मुलगी गेल्या 2 महिन्यापासून दाम्पत्याच्या घरी घरकाम करत होती. या दरम्यान बुधवारी दाम्पत्याने या चिमुकलीला बेदम मारहाण केली होती. मारहाणीची ही संपूर्ण घटना तिच्या नातेवाईकांनी पाहिली होती. या घटनेची माहिती मिळताच जमावाने विरोध करत दाम्पत्याला मारहाण केली. या अल्पवयीन मुलीचे मेडिकल करण्यात आले आहे. मुलीच्या शरीरावर जळाल्याचे आणि डोळ्याजवळ जखमा आढळल्या आहेत.
दरम्यान या घटनेप्रकरणी आता भारतीय दंड कलम 323 (स्वच्छेने दुखापत करणे),324 (स्वच्छेने धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी दुखापत करणे),342 (चुकीने बंदिस्त करणे) आणि 370 गुलाम म्हणून खरेदी करणे अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. तसेच आरोपी पूर्णिमाने देखील जमावाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी जमावाविरुद्ध आयपीसी कलम 323 (स्वेच्छेने दुखापत करणे) आणि 341अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT