कल्याण: मंत्रालयात काम करतो.. गाडीला अंबर दिवा लावून फिरतो. सोसायटीत इतकी दहशत की, कोणीही त्याच्या विरोधात बोलत नाही. अशी दहशत कल्याणच्या अजमेरा हाईटसमध्ये राहणाऱ्या अखिलेश शुक्ला याची आहे. धूप लावण्याच्या वादातून अखिलेश शुक्ला याने दहा ते पंधरा जणाच्या टोळीला बोलवून सोसायटीतील तीन जणांना बेदम मारहाण केल्याची धक्कादाय घटना कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाइल सोसायटीत घडली आहे. मात्र, या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. तसंच आता या प्रकरणात मनसेनेही एंन्ट्री केली आहे.
ADVERTISEMENT
दोन दिवसात अखिलेश शुक्लाला अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरु. शुक्ला जिथे कुठे असेल त्याला मनसे स्टाईलने पोलिसात हजर करु. असा इशारा मनसेने यावेळी दिला आहे. दरम्यान, खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणात परस्परविरोधी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पश्चिमेतील योगीधाम परिसरात अजमेरा हाईटस ही इमारत आहे. या हाय प्रोफाईल इमारतीतच अखिलेश शुक्ला हा अधिकारी राहतो. त्याच्या शेजारी अभिजीत देशमुख आणि विजय कल्वीकट्टे राहतात. बुधवारी रात्री शुक्ला याने घराबाहेर धूप लावला होता. धूपाच्या धुराचा शेजाऱ्यांना त्रास होता होता. याबाबत शेजारी विजय कल्वीकट्टे याने शुक्ला याला टोकले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
हे ही वाचा>> शरद पवार आणि PM मोदींच्या भेटीनंतर होणार सगळ्यात मोठा राजकीय धमाका? | Opinion
या वादातून शुक्ला याने बाहेरून दहा ते पंधरा जणाना बोलावून घेतले. 'मराठी लोक भिकारडे...' असं हिणवत शुक्लाने त्याच्या शेजाऱ्यांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभिजीत देशमुखच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर विजय कळविकटे, धीरज देशमुख हे जखमी झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
◆ अखिलेश शुक्ला हा मंत्रालयात काम करतो. त्याच्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरतो. त्याच्या विरोधात कोणी बोलले तर तो त्याला दमबाजी करतो. काही दिवसापूर्वी एका किरकोळ कारणावरुन त्याने एका तरुणीला तिच्या बापासमोरच तिच्यावर रेप करण्याची धमकीही दिल्याचा त्याचावर आरोप आहे. दरम्यान, या राड्यानंतर खडकपाडा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
हे ही वाचा>> Honeymoon ला जाण्यावरून वाद, कल्याणमध्ये सासऱ्याचा जावयावर Acid हल्ला
◆ या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी सांगितले की, 'धूप लावण्याच्या वादातून हाणामारी झाली आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अखिलेश शुक्ला याच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.
◆ आता या प्रकरणात मनसेनेही एंट्री केली आहे. अखिलेश शुक्ला हा सातत्याने मराठी माणसांना दमबाजी करतो. तुम्ही मराठी आहात, तुम्हाला माझी ताकद माहिती नाही. अशा प्रकारे लोकांना भीती दाखवितो. याबाबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी खडकपाडा पोलिसांची भेट घेतली आहे. अखिलेश शुक्ला यांची मुजोरी मोडीत काढली पाहिजे. त्याची गुंडगिरी सातत्याने सुरु आहे. दोन दिवसात त्याला अटक केली नाही तर मनसे स्टाईलने शुक्ला याला धडा शिकवून त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ. असं ते यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT