-दीपेश त्रिपाठी, मुंबई
ADVERTISEMENT
Mukesh Ambani death threat : देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये. यावेळी धमकी देणाऱ्या व्यक्तीने 200 कोटी रुपयांची मागणी करणारा ईमेल पाठवला आहे. यापूर्वी त्याने 20 कोटी रुपयांची मागणी केली होती. पुन्हा एकदा त्याच ईमेल खात्यावरून दुसरा मेल आला आहे. (India’s biggest industrialists Mukesh Ambani gets death threat)
ईमेल करणार्याने म्हटले आहे की, अद्याप आमच्या ईमेलला कोणतंही उत्तर दिलं गेलं नाहीये. त्यामुळे आता 200 कोटी रुपये द्यावे लागतील. जर असे केले नाही तर लक्षात ठेवा की डेथ वॉरंटवर आधीच स्वाक्षरी झाली आहे. ज्या ईमेलमधून धमकी देण्यात आली आहे, त्यात म्हटलं आहे की, “U have not responded to our email. Now the amount is 200 crore, otherwise the death warrant is signed.(तुम्ही आमच्या ईमेलला उत्तर दिलं नाहीये. आता 200 कोटी रुपये द्या, अन्यथा डेथ वॉरंटवर स्वाक्षरी झालीच आहे”.
27 ऑक्टोबरला मिळाली होती धमकीही
यापूर्वी धमकी देणाऱ्या व्यक्तीने 27 ऑक्टोबर रोजीही मेलही पाठवला होता. मुकेश अंबानींच्या कंपनीच्या ईमेल आयडीवर पाठवलेल्या ईमेलमध्ये ‘तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहे’, असे लिहिलेले होते.
हे ही वाचा >> OYO रूममध्ये प्रियकरासोबत पोहोचली विवाहित प्रेयसी, चेकआऊटवेळी दोघंही आढळले भयानक अवस्थेत!
गावदेवी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच्या तक्रारीवरून मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. खंडणीच्या या मेलमध्ये असे लिहिलेले होते की, पैसे न दिल्यास मुकेश अंबानींवर हल्ला करू. त्यांच्याकडे देशातील सर्वोत्तम नेमबाज आहेत.
हे ही वाचा >> बायकोचा प्रियकर, नवऱ्याने पाहिले पत्नीचे मेसेज, अन् मुलासोबत स्वत:ही…
गेल्या वर्षीही मिळाली होती धमकी
यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन केला होता. त्याने रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर फोन करणाऱ्याने मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची नावे घेतली आणि जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच मुकेश अंबानी यांचे घर अँटिलिया उडवून देण्याची धमकी दिली होती.
ADVERTISEMENT