Uddhav Thackeray : "संपूर्ण मुंबई आपल्या ताब्यातून हिसकावून...", उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मुंबई तक

18 Nov 2024 (अपडेटेड: 18 Nov 2024, 09:12 PM)

Uddhav Thackeray On BJP:  "मुंबईतला मराठी माणूस मुंबई सोडून उपनगरात गेला. आता उपनगर सोडून गुजरातला जाणार का? कारण सर्वकाही इथून उचलून नेऊन गुजरातला चाललं आहे. आपलं जे नातं आहे शिवसेना आणि मुंबई हे कोणी तोडू शकत नाही.

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde

Uddhav Thackeray On CM Eknath Shinde

follow google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर केला हल्लाबोल

point

"...पण अदानी तर डोक्यावर बसलाच"

point

वांद्र्याच्या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray On BJP:  "मुंबईतला मराठी माणूस मुंबई सोडून उपनगरात गेला. आता उपनगर सोडून गुजरातला जाणार का? कारण सर्वकाही इथून उचलून नेऊन गुजरातला चाललं आहे. आपलं जे नातं आहे शिवसेना आणि मुंबई हे कोणी तोडू शकत नाही. त्यांच्या होर्डिंग कितीही लागू देत. पण कोस्टल रोडचं वचन हे फक्त शिवसेनेनं दिलं होतं आणि ते पूर्ण करून दाखवलं आहे. हे आता फिती कापायला येत आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढल्यानंतर एक उद्रेक आहे. संताप आहे. कारण सरकार तर आपलं पाडलंच. उद्धव ठाकरेंच्या सरकारला पूर्ण वेळ द्यायला पाहिजे होता. चांगलं काम सुरु होतं, असं लोक सांगतात. सगळ्यांना सोबत घेऊन चाललो होतो. बटेंगे तो कटेंगे असा त्यांचा प्रचार सुरु आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कोण कटलं होतं. कुणाचीच हिंमत होत नव्हती काही कापायची. आपली संपूर्ण मुंबई आपल्या ताब्यातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही लढाई महाराष्ट्र, मुंबई आणि तुमच्या सर्वांच्या भविष्याची लढाई आहे, असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलं". ते वरुण सरदेसाई यांच्या प्रचारसभेत वांद्र्यात बोलत होते.

हे वाचलं का?

मी वरुणचं भाषण पहिल्यांदा ऐकलं. पूर्ण अभ्यास करून कसं बोलावं, हे वरुणने आज दाखवलं. वरुण विधानसभेत किती प्रश्न सोडवेल, याची चुणूक त्याने दाखवली आहे. इथले पुनर्विकास प्रकल्प जे रखडलेले आहेत. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सोडवण्याची सुरुवात केली होती. दुर्देवाने नेमका कोरोना आला. त्यानंतर गद्दारी झाली. ते रडगाणं गात बसण्यापेक्षा मी तुम्हाला सर्वांना वचन देतोय. इथे जे जे प्रकल्प अडलेत आणि त्या प्रकल्पांना नडलेत त्यांना बाजूला फेका. गरज पडली तर सरकारतर्फे हे प्रकल्प मी तुम्हाला पूर्ण  करून देईल. तुम्ही इथले रहिवासी आहात. आपण नुसतं बोलायचं अदानी अदानी..पण अदानी तर डोक्यावर बसलाच आहे. मग माझी मूळ माणसं मुंबईकर जाणार कुठे? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. 

हे ही वाचा >> Maharashtra Vidhansabha Election 2024: बारामतीतील प्रचाराच्या शेवटच्या सभेतील शरद पवारांचं भाषण जसंच्या तसं...

खरं पाहिलं तर प्रचार करण्याची काही गरज नाहीए. तुमचं आणि माझं मत एका मतपेटीत पडणार आहे. मत कुणाला द्यायचं हे मी ठरवलं आहे. तुमचं काय? मशाल..वरुण तू काळजी करू नकोस कलानगरचा गटप्रमुख तुझ्यासोबत आहे. हा मतदारसंघ माझा मतदारसंघ आहे. कारण मी वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षापासून याच मतदारसंघात राहतोय. शिवसेनाप्रमुखांच्या काळातले इथले बरेचसे शिवसैनिक मी नावाने ओळखतो. कारण त्यांच्यासोबतच मी लहानाचा मोठा झालो आहे. आता दाढीवाल्या गद्दारांवर बोलण्याची गरज आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. 

हे ही वाचा >>Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेबाबत CM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले, "एक घरात दोन बहिणी..."

    follow whatsapp