Eknath Shinde: लाडकी बहीण योजनेबाबत CM एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले, "एक घरात दोन बहिणी..."

मुंबई तक

18 Nov 2024 (अपडेटेड: 18 Nov 2024, 06:38 PM)

CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana:  कर्नाटकमध्ये त्यांची गृहलक्ष्मी योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काय फरक आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "कर्नाटकमध्ये एका घरातल्या एक बहिणीला याचा लाभ मिळतो. पण...

Eknath Shinde On ladki Bahin Yojana

Eknath Shinde On ladki Bahin Yojana

follow google news

बातम्या हायलाइट

point

लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले?

point

"मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो,जवळपास 75 पेक्षा जास्त सभा घेतल्या, पण..."

point

एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

CM Eknath Shinde On Ladki Bahin Yojana:  कर्नाटकमध्ये त्यांची गृहलक्ष्मी योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काय फरक आहे? या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "कर्नाटकमध्ये एका घरातल्या एक बहिणीला याचा लाभ मिळतो. पण आपल्या महाराष्ट्रात एक घरात दोन बहिणी असल्या तरीसुद्धा त्यांना याचा लाभ मिळेल, असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आम्ही भेदभाव करत नाही. जातीपातीचा भेदभाव नाही. मराठी माणसांना, उत्तर भारतीयांना, हिंदूना, मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, सर्वांना या योजनेचा लाभ मिळतोय. आम्ही त्यात काही बदल केला नाही. आमची योजना सर्वसमावेशक आहे. लाडक्या बहिणींना आधार मिळण्यासाठी आम्ही लाडकी बहीण योजना सुरु केली. मी शेतकी कुटुंबातील मुलगा आहे. सर्वसामान्य कुटुंब कसं चालतं? हे मी माझ्या आईकडून पाहिलंय. माझ्या आईने गरिबी बघितली आहे".

हे वाचलं का?

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो. जवळपास 75 पेक्षा जास्त सभा घेतल्या. सभांमध्ये मी पाहिलं की, आतापर्यंतच्या इतिहासात एव्हढा प्रतिसाद मिळाला नव्हता, जितका प्रतिसाद आताच्या सभांना मिळाला. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, सभेला यायचे आणि एक सकारात्मक वातावरण मी पाहिलं. सरकारने दोन सव्वादोन वर्षात केलेली कामं आम्ही लोकांच्या समोर मांडत होतो. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने ज्या प्रकल्पांना स्टे दिला, पण मुंबईतले प्रकल्प आपण पाहतोय. कोस्टल, अटल सेतू, मेट्रोचे प्रकल्प आहेत. कारशेड आहे".

हे ही वाचा >> Supriya Sule: टेक्सटाइल पार्कमध्ये आईला अडवलं, सुप्रिया सुळेंच्या जिव्हारी लागलं.. अजितदादांना भडाभडा सुनावलं!

त्याचबरोबर जलयुक्त शिवार योजना, जलसिंचनाचे प्रकल्प, समृद्धी महामार्ग अशा अनेक प्रकल्पांना खो घालण्याचं काम महाविकास आघाडीने केलं. तुम्ही अडीच वर्षात काय केलं आणि आम्ही दोन सव्वादोन वर्षात काय केलं? असं माझं त्यांना खुलं आव्हान आहे. होऊन जाऊद्या समोरासमोर दूध का दूध पाणी का पाणी. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आणि वेळेच्या आधी पूर्ण केले. नवीन प्रकल्पांनाही चालना आम्ही दिली. महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही मी होतो. फक्त चार प्रकल्पांना मान्यता दिली. आमच्या सरकारने 124 प्रकल्पांना मान्यता दिली. लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेतले, असंही शिंदे म्हणाले.

हे ही वाचा >> Ajit Pawar Baramati : लोकसभेला एकटा होतो, पण आता माझी आई, बहिणींची साथ... अजितदादा कडाडले

    follow whatsapp