Sharad Pawar Baramati Speech: बारामती विधानसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार असा राजकीय सामना पुन्हा एकदा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांनी रणशिंग फुंकलं आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीच्या सभेत मोठं भाष्य केलं. "आज युगेंद्र यांची निवड त्या ठिकाणी केली. अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतलं. परत आल्यावर साखर कारखान्यात लक्ष घातलं. उसाच्या शेतीत लक्ष घातलं. आज या ठिकाणी विद्या प्रतिष्ठान संस्था आहे. 20 हजार मुलं शिकत आहेत. त्या ठिकाणच्या अर्थकारणाची सगळी जबाबदारी युगेंद्रकडे आहे. ती जबाबदारी ते उत्तम पद्धतीन सांभाळत आहेत, असं शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
शरद पवार पुढे म्हणाले, "तुमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याची धमक आणि ताकद ज्याच्या हातात आहे त्याला उद्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बारामतीचा प्रतिनिधी म्हणून पाठवायचं आहे. काही लोक सांगतात.. मी काय करू.. मोठी गंमतीची गोष्ट आहे. 1967 साली तुम्ही मला आमदार केलं. 20 वर्ष मी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री या पदावर होतो.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "माझ्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही, तर...", देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा
नंतर मी ठरवलं नवी पिढी आली पाहिजे. अजितदादांना आणलं.. 20-25 वर्ष त्यांनी बघितलं. पक्षाने त्यांना संधी दिली. दोनदा-तीनदा उपमुख्यमंत्री बनवलं. काम करण्याचा अधिकार दिला. त्यांनी काम केलं. माझी काय तक्रार नाही. आता पुढं काय करायचं. माझी पिढी, माझ्यानंतर अजितची पिढी आणि त्यानंतर नवी पिढी ही युगेंद्रची पिढी. युगेंद्रच्या पिढीकडे अधिकार दिले.. बारामतीचे समाजकारण करण्याचा, इथलं अर्थकारण सुधारण्याचं काम करण्याची गरज आहे, असंही शरद पवार म्हणाले.
हे ही वाचा >> Sharad Pawar : अजित पवारांनी कामं केली, माझी तक्रार नाही, पण... युगेंद्रंच्या प्रचारसभेत काय म्हणाले पवार?
जो विचारवंत आहे, उच्चशिक्षित आहे, स्वच्छ चारित्र्याचा आहे. त्यामुळे अशा तरुणाकडे नेतृत्वाची जबाबदारी द्यायला हवी. मी तुम्हाला खात्री देतो.. हे काम यांच्या हातात सोपवा.. गेले काही महिने या तालुक्यातील काही महिने त्यांनी प्रत्येक गाव फिरून लोकांशी संपर्क साधला. त्यांचा प्रयत्न हा आहे की, प्रश्न समजून घ्यायचे. काय करायचं आवश्यकता आहे याची माहिती घ्यायची.बारामतीचा नावलौकीक हा सगळीकडे आहे. आज देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा.. बारामतीचं नाव काढलं की, ते नाव घेतात.. ते कोणाचं नाव घेतात? असा सवालही पवारांनी उपस्थित केला.
माझा तुम्हा सगळ्यांना आग्रह आहे की, मतांचा विक्रम करा मोठ्या मतांनी त्यांना विजयी करा. मी तुम्हाला शब्द देतो की, बारामतीचा चेहरा बदलण्यासाठी गेली 5-50 वर्ष काम केलं. त्याहीपेक्षा अधिक जोमाने काम करण्याची हिंमत, कष्ट करण्याची तयारी ही युगेंद्रमध्ये आहे. त्यामुळे त्याला विजयी करा, असं आवाहन पवारांनी जनतेला केलं.
ADVERTISEMENT