Salman Khan Death Threat Case : लॉरेन्सच्या नावाने सलमानला धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, भाजीवाला म्हणाला मी...

मुंबई तक

24 Oct 2024 (अपडेटेड: 24 Oct 2024, 05:23 PM)

Salman Khan Threatened person arrested: मुंबई पोलिसांनी सलमान खानला आलेल्या धमकी प्रकरणात कारवाई करत जमशेदपूर एका आरोपीला अटक केली.

सलमानला धमकी देणाऱ्याला अटक

सलमानला धमकी देणाऱ्याला अटक

follow google news

बातम्या हायलाइट

point

सलमान खानला धमकी देणारा ताब्यात

point

लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने दिली होती धमकी

point

मुंबई पोलिसांकडून आरोपीला अटक

Salman Khan threatened person arrested : अभिनेता सलमान खानला गेल्या अनेक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं धमक्या येत असतात. लॉरेन्स बिश्नोईने स्वत:देखील सलमान खानला कॅमेऱ्यासमोर धमक्या दिल्या आहेत. त्यानंतर मागच्या काही काळापूर्वी सलमान खानच्या घरावरही गोळीबार झाला. तसंच त्यानंतर सलमान खानचे नीकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर सलमान खानला पुन्हा एकदा पाच कोटी रुपयांची खंडनी मागणारा धमकीचा मेसेज आला होता. त्या प्रकरणात आता  पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. (Mumba Police Arrested person threatened Salman Khan with Rs 5 crore in the name of Lawrence Bishnoi was arrested)

हे वाचलं का?

हे ही वाचा >>Rohit Pawar Sangola : ऐकावं ते नवलचं! रोहित पवार म्हणाले, ठाकरेंच्या यादीत टेक्निकल एरर, सांगोल्यातून 'हा' उमेदवार

 

मुंबई पोलिसांनी सलमान खानला आलेल्या धमकी प्रकरणात कारवाई करत झारखंडमधून एका आरोपीला अटक केली. झारखंडच्या जमशेदपूरमधून पकडलेला हा आरोपी भाजी विकण्याचं काम करतो. टीव्हीवर लॉरेन्स बिश्नोई आणि सलमानला आलेल्या धमक्यांच्या बातम्या तो पाहत होता. त्यानंतर त्याच्या डोक्यात हा विचार आला. या महाशयाने थेट मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअॅपवर हा धमकीचा मेसेज पाठवला होता. धमकीचा हा मेसेज पाठवल्यानंतर आरोपीने आपला फोन बंद करुन ठेवला होता. 

मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव शेख असं असून, तो 24 वर्षांचा आहे. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो आधी भाजी विकण्याचं काम करायचा, मात्र आता तो कुठलंही काम करत नाही. धमकीचा मेसेज करणाऱ्या आरोपीने नंतर माफी देखील मागितली. धमकीचा हा मेसेज आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा फोन ट्रेस करायला सुरूवात केली होती. त्यानंतर पोलिसांना हा मेसेज जमशेदपूरमधून आल्याचं कळलं. तेव्हा पोलिसांनी जमशेदपूरमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. 

धमकीच्या मेसेजमध्ये काय म्हटलं होतं?


हे ही वाचा >>Amol Mitkari Akola : राष्ट्रवादीचं काही अस्तित्व आहे की नाही... उमेदवारीसाठी आक्रमक, मिटकरी इरेला पेटले |Maharashtra Assembly Election 2024 |

 

लॉरेन्स बिश्नोईचा नीकटवर्तीय असल्याचं सांगत आरोपीने मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअॅपवर धमकीचा मेसेज पाठवला होता. या मेसेजमध्ये असं म्हटलं होतं की, सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वैर असून, ते संपवायचं असेल तर आपण यामध्ये मध्यस्थी करू. यासाठी 5 कोटी रुपयांची मागणी देखील करण्यात आली आहे. तसंच  धमकी देणारा एवढ्यावरच थांबला नव्हता. त्याने असंही म्हटलंय की, 'हलक्यात घेऊ नका, नाहीतर 'सलमान खानचे हाल बाबा सिद्दींपेक्षा वाईट होतील.' या मेसेजनंतर मुंबई पोलिसांनी प्रकरणाचा शोध सुरू केला होता.
 

    follow whatsapp