Rape Case : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहेत. गुन्हेगारीच्या घटना घडत असतानाच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अशा घटना चालून असतानाच मुंबईतील ट्रॉम्बे पोलिसांच्या (Trombay Police Station) हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका 64 वर्षाच्या महिलेवर बलात्कार (Rape) करून तिला मारहाण केल्या प्रकरणी 38 वर्षाच्या आरोपीला अटक करण्यात आले आहे. ( Mumbai Trombay police area elderly woman was raped young boy )
ADVERTISEMENT
तुला घरी सोडतो…
युवकाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या महिलेला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पीडित महिला ही झाडू विकण्याचा आणि मासे विकण्याचे काम करते. तिला घरी सोडतो असं सांगून त्या वृद्ध महिलेला आपल्या घरी घेऊन जाऊन तिच्या बलात्कार करून तिला प्रचंड मारहाण करण्यात आली आहे.
हे ही वाचा >> IPL 2024 : लिलावानंतर ‘या’ संघाची वाढली ताकद, पाहा आयपीएलच्या 10 संघाचे संपूर्ण स्क्वॉड
जबरदस्ताने शारीरिक संबंध
ज्या महिलेवर अत्याचार करून मारहाण करण्यात आली आहे, त्या महिलेला त्या युवकाने 18 डिसेंबर रोजी तुला तुझ्या घरी सोडतो असं सांगून तो आपल्या घरी घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने जबरदस्तीने महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवले. महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्याने जबरदस्ती केली त्यावेळी, त्याला महिलेने विरोध केला. महिलेने त्याला विरोध करताच त्याने तिला काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.
नग्न अवस्थेत फेकले बाहेर
आरोपीने महिलेला फक्त मारहाणच केली नाही तर त्याने महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावाही घेतला आहे. त्यावेळी मारहाण करत तिला तिच्या अंगावरचे कपडे फाडून त्याने महिलेला नग्न अवस्थेतच घराबाहेर फेकून दिले होते. या मारहाणीत महिलेच्या अंगावर अनेक ठिकाणी तिला गंभीर दुखापत झाली आहे.
पोक्सो अंतर्गत गुन्हा
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र या आरोपीने महिलेला प्रचंड मारहाण केल्यामुळे ती महिला गंभीर जखमी झाली आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगत आरोपीविरोधात छेडछाड आणि पोक्सो अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT