Crime News: मेरठ: जिच्यावर जीवापाड प्रेम केलं, जिच्यासाठी आपल्या कुटुंबाला सोडलं त्याच पत्नीने आपल्या पतीचा अत्यंत थंड डोक्याने पण तितक्याच क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना ही उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. आरोपी पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांना या हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. प्रियकराने लावलेल्या एका सवयीमुळे ही संपूर्ण घटना घडल्याचं आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
मुस्कान रस्तोगी हिने ज्या पद्धतीने आणि ज्या कारणासाठी आपल्या पतीची हत्या केली त्याने सगळेच हादरून गेले आहेत. सौरभ राजपूत याने मुस्कान रस्तोगीसोबत लग्न केल्यानंतर सौरभचे त्याच्या कुटुंबाशी संबंध खराब झाले होते. त्यामुळे त्याला कोट्यवधींच्या मालमत्तेतूनही त्याला बेदखल करण्यात आलं होतं. ज्या मुस्कानसाठी त्याने सगळ्यांशी नाती तोडली होती त्याच मुस्काने आपल्या प्रियकरासोबत मिळून सौरभची निर्घृण हत्या केली.
हे ही वाचा>> Honeymoon वेळी झालेला पती-पत्नीचा मृत्यू, आता काकूने सांगितली नवी कहाणी
आता मुस्कानच्या पालकांनीही आपल्या मुलीची साथ सोडली आहे. मुस्कानचे वडील प्रमोद आणि आई कविता यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना आता त्यांच्या जावयासाठी न्याय हवा आहे. त्यांचा जावई म्हणजेच सौरभ हा त्यांच्या मुलीवर अतोनात प्रेम करायचा. सौरभनेही आपल्या मुलीसाठी कोट्यवधींची मालमत्ता सोडली. म्हणून आता त्यांना आपल्या जावयासाठी न्याय हवा आहे. तसंच मुलगी मुस्कानलाही फाशी व्हावी अशी मागणी केली आहे. मुस्कानच्या पालकांचे म्हणणे आहे की, त्यांनी स्वतः त्यांच्या मुलीला पोलिसांकडे नेले आणि प्रकरण उघडकीस आणलं.
मुस्कानच्या पालकांनी सांगितली हादरवून टाकणारी कहाणी
मुस्कानचे वडील प्रमोद आणि आई कविता यांनी या संपूर्ण प्रकरणी अत्यंत धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी म्हटले की, त्यांच्या मुलीला आता जगण्याचा अधिकार नाही. मुस्कानची आई कविता म्हणाली, 1 मार्च रोजी सौरभने त्याच्या 6 वर्षांच्या मुलीला आमच्या घरी सोडलं. दरम्यान, 4 मार्चच्या रात्री मुस्कानने सौरभच्या जेवणात औषध मिसळून त्याला बेशुद्ध केलं. त्यानंतर तिने चाकूने वार करून त्याची हत्या केली. त्यातनंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून तो एका ड्रममध्ये भरला आणि वरून सिंमेटने तो ड्रम बंद करून टाकला.
हे ही वाचा>> प्रियकराने सोशल मीडियावर प्रेयसीचे अश्लील फोटो केले व्हायरल, पण...
मुस्कानने फोन केला अन्..
मुस्कानच्या पालकांनी सांगितले की, त्यांना आश्चर्य वाटत होते की 1 मार्चनंतर सौरभचा काहीच संपर्क झालेला नव्हता. त्याच्याशी अजिबात बोलणं झालं नव्हतं. तसंच मुस्कानही सौरभशी काहीही बोलणं करू देत नव्हती. ती नेहमीच काही ना काही सबबी सांगत होती. यानंतर, 17 मार्च रोजी सकाळी मुस्कानने आई-वडिलांना फोन केला. तेव्हा तिने सांगितले की, सौरभ आणि तिच्यात भांडण झाले आहे आणि घरी येऊन ती सारं काही सांगेल.
त्यानंतर मुस्कान ही थोड्याच वेळात घरी परतली. घरी येताच ती रडू लागली. यावेळी तिने सांगितले आई-वडिलांना सांगितलं की, सौरभला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मारलं आहे. मुस्कानच्या पालकांना यावर विश्वासच बसत नव्हता. मुस्कान जे काही सांगत होती त्यावर तिच्या पालकांना संशय आला. त्यामुळे ते तिला सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊ लागले. पण पोलिसांच्या भीतीने तिने अर्ध्या वाटेतच आपल्या आई-वडिलांना आपण नेमकं काय केलं हे सांगितलं.
साहिलने मुस्कानला लावलेली नको ती सवय
मुस्कानच्या पालकांचे म्हणणे आहे की, या सगळ्याला जबाबदार मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल शुक्ला हा आहे. साहिल हा बालपणी त्यांच्या मुलीसोबत एकत्र शिक्षण घेत असे. 2019 मध्ये, तो सोशल मीडियाद्वारे त्यांच्या मुलीशी पुन्हा संपर्कात आला. दोन वर्षांपूर्वी सौरभ लंडनला गेला तेव्हा साहिलने मुस्कानला मित्र म्हणून भेटायला सुरुवात केली. तेव्हाच त्याने मुस्कानला ड्रग्जचे व्यसन लावले.
मुस्कानच्या वडिलांचे म्हणणे आहे की, जेव्हा त्यांनी मुस्कानला विचारले की, तिने सौरभचा खून का केलं? तेव्हा तिने सांगितले की तिने हे साहिलच्या सांगण्यावरून केलं. साहिलने तिला सांगितले की जर सौरभला मारून टाकलं नाही तर ते ड्रग्जचं सेवन करू शकणार नाही.
मुस्कानचे पालकांनी हे देखील सांगितलं की, सौरभ त्यांच्या मुलीवर आंधळेपणाने विश्वास ठेवायचा. तो तिच्याशिवाय इतर कोणाचेही ऐकत नव्हता.
दरम्यान, या घटनेनंतर सौरभ राजपूतच्या कुटुंब हे प्रचंड शोकात बुडालं आहे. सौरभ लंडनमधील मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी होता. तो फक्त त्याची पत्नी मुस्कान आणि मुलीला भेटण्यासाठी मेरठला आला होता. पण इथे आल्यावर त्याच्याच पत्नीने त्याची निर्घृण हत्या केली.
ADVERTISEMENT
